tiffin box recipe ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

असा द्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी टिफिन बॉक्स

पहिल्या दिवशी हा पदार्थ मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये द्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुलांच्या सुट्टया संपून आता त्यांची शाळा सुरू होईल आणि पुन्हा गृहिणीची तारेवरची कसरत. मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न काही महिन्यानंतर आता पुन्हा त्यांच्या समोर उभा राहणार.

हे देखील पहा -

रोज सकाळी जेवणाच्या डब्यात काय द्यायचे ? मुलांच्या शाळेचा पहिला दिवस आनंदी कसा जाईल? टिफिन पाहताच क्षणी तो तोंड वाकडे करेल की, आनंदाने खाईल? असे अनेक प्रश्न पडले असतील तर घाबरु नका. आपल्या सकाळच्या कामात व मुलांच्या वेळेत आपण त्यांच्या आवडीचा टिफिन बॉक्स त्यांना देऊया.

केळ्याचे पॅनकेक

मुलांना केळी खायला भरपूर आवडते पण त्याच्या आरोग्याच्या बाबतीत आपण पालक म्हणून सतत चिंतेत असल्यामुळे त्यांना आपण ते खाऊ देत नाही. त्यांच्या शाळेचा पहिला दिवस गोड करण्यासाठी आपण इतके मुलांसाठी करु शकतो.

साहित्य-

पिकलेली केळी (Banana) - १ १/२

दूध - ३/४ कप

गव्हाचे पीठ- १/२ कप

चिरलेला गूळ- ४ ते ५ छोटे चमचे

खोवलेला ओला नारळ - २ ते ३ छोटे चमचे

वेलची पूड - १/४ छोटा चमचा

दालचिनी पुड - १/४ छोटा चमचा

तूप - ४ ते ५ छोटे चमचे

सुक्या मेवा काप गरजेप्रमाणे

कृती -

मिक्सरच्या भांड्यात पिकलेल केळ, चिरलेला गुळ, गव्हाचे पीठ व दूध (Milk) उकळवून थंड करुन यात घाला. मिश्रणाचे डोश्याच्या पीठासारखे बॅटर तयार करा. मिश्रण बाऊलमध्ये घेऊन त्यात किसलेल्या ओल्या नारळाचा किस घाला. त्यात वेलची पूड व दालचिनी पूडही घाला. मिश्रण चांगले एकजीव करा. त्यानंतर पॅन गरम करुन त्याला तूप लावून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवून छोटे छोटे पॅन केक बनवा. वरची बाजू ओली असताना त्याच्यावर ड्रायफ्रूटस लावा व ओल्या नारळाचा किस ही घालू शकता. चांगले शिजल्यानंतर रेडी आहे तुमच्या चिमुकल्याचे पॅनकेक.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

FDAचा कारवाईचा धडाका सुरूच; मुंबईतील 100 वर्षाहून जुन्या बेकरीचा FSSAI परवाना निलंबित

Cylinder Blast : जेवण बनवताना गॅस सिलिंडरचा स्फोट, ३ घरं कोसळली, लहान मुलासह चौघांचा मृत्यू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

SCROLL FOR NEXT