LPG Price Today Saam Tv
लाईफस्टाईल

LPG Price Today : सर्वसामान्यांना दिलासा ! घरगुती सिलिंडरच्या किमती जारी

1 फेब्रुवारीला देशातील सरकारी गॅस वितरण कंपन्यांनी ताज्या किमती जाहीर केल्या आहेत.

कोमल दामुद्रे

LPG Price Today : अर्थमंत्री आज भारताचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी 1 फेब्रुवारीला देशातील सरकारी गॅस वितरण कंपन्यांनी ताज्या किमती जाहीर केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी गॅस कंपनी इंडेनने 1 फेब्रुवारी रोजी नवीनतम दर यादी जारी केली आहे.

गॅस (Gas) कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला गॅसच्या किमती अपडेट करतात. गेल्या वर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) दिवशी गॅस कंपन्यांनी एलपीजीच्या दरात 100 रुपयांनी वाढ केली होती.

1. जानेवारीत घरगुती गॅस महाग झाला

2023 वर्षाची सुरुवात महागाईच्या धक्क्याने झाली. 2023 च्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत (Price) 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत व्यावसायिक गॅसची किंमत प्रति सिलेंडर १७६९ रुपये, मुंबईत (Mumbai) १७२१ रुपये, कोलकात्यात १८७० रुपये, चेन्नईत १९१७ रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या नवीन किंमतींचा तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवर थेट परिणाम होणार नाही, परंतु रेस्टॉरंट, हॉटेल्स इत्यादींमध्ये खाद्यपदार्थ महाग झाले आहेत.

2. 2022 मध्ये सिलिंडर किती महाग आहे

देशात पेट्रोल डिझेलच्या किमती आटोक्यात असताना, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत एकूण १५३.५ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली होती. वर्षाच्या मध्यात व्यावसायिक गॅसच्या किमती 2000 रुपयांच्या पुढे गेल्या होत्या. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलै 2022 रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी तेल कंपन्यांनी घरगुती सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले ​​होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News: भंडारा नगरपरिषदेत २०० कोटींचा भ्रष्टाचार; परिणय फुकेंचा गंभीर आरोप|VIDEO

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT