Gas Cylinder Connection Saam Tv
लाईफस्टाईल

Gas Cylinder Connection : आता गॅस कनेक्शनसोबतही मिळतोय 50 लाखांचा विमा; जाणून घ्या, कोणाला होईल याचा फायदा

आपल्यापैकी अनेकांना गॅस सिलिंडरशी संबंधित ग्राहकांच्या हक्कांची माहिती नसते.

कोमल दामुद्रे

Gas Cylinder Connection : बदलेल्या काळानुसार आता प्रत्येकाकडे गॅस कनेक्शन आहे. जर तुम्ही अजूनही गॅस कनेक्शन घेतले नसेल तर ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आज भारतातील जवळपास प्रत्येक घरात गॅस सिलेंडर कनेक्शन आहे. पण आपल्यापैकी अनेकांना गॅस सिलिंडरशी संबंधित ग्राहकांच्या हक्कांची माहिती नसते.

बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. म्हणूनच ग्राहकांनी स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक असले पाहिजे.

आम्ही तुम्हाला सांगतो की जे एलपीजी गॅस (Gas) कनेक्शन घेतात त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या पॉलिसीला एलपीजी इन्शुरन्स कव्हर म्हणतात. गॅस सिलिंडरमुळे होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी हे दिले जाते. तुम्हाला गॅस कनेक्शन मिळताच तुम्ही या पॉलिसीसाठी पात्र ठरता. नवीन कनेक्शन मिळताच तुम्हाला हा विमा मिळेल.

LPG विमा कवच काय आहे ?

एलपीजी विमा गॅस सिलिंडर खरेदी करताना केला जातो. तुम्ही नेहमी एक्स्पायरी डेट पाहूनच सिलेंडर घ्या. कारण ते विमा (Insurance) सिलेंडरच्या एक्सपायरी डेटशी जोडलेले असते. गॅस कनेक्शन मिळताच तुम्हाला ४० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेल. यासोबतच सिलिंडरच्या स्फोटामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतचा दावा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. गॅस सिलिंडरमुळे अपघात झाल्यास पीडितेच्या कुटुंबीयांना त्यासाठी दावा करता येईल.

तुम्ही असा दावा करू शकता

  • ग्राहकाने अपघात झाल्यास ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलिस स्टेशनला अपघाताची तक्रार करावी.

  • अपघाताच्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घेणे आवश्यक आहे.

  • दाव्यासाठी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या प्रतसोबतच वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही आवश्यक आहे.

विम्याचा संपूर्ण खर्च या कंपन्या उचलतात

  1. ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे त्यालाच विम्याची रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही.

  2. दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे सिलेंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.

  3. दाव्यासाठी, तुम्ही सिलिंडर आणि स्टोव्हची नियमित तपासणी करत रहावे.

  4. तुमचा वितरक तेल कंपनी आणि विमा कंपनीला अपघाताची माहिती देतो.

  5. इंडियन ऑइल (इंडियन ओआयएल), एचपीसीएल, बीपीसीएल यासारख्या तेल कंपन्या सिलिंडरमुळे अपघात झाल्यास विम्याचा संपूर्ण खर्च उचलतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ChatGPT वरून माहिती घेतली, १६ वर्षाच्या मुलाने आयुष्य संपवलं, पालकांची कोर्टात धाव

Maharashtra Live News Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना एका दिवसाची परवानगी

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : पुण्यातील मानाचे पाचही गणपती बाप्पा विराजमान

Gadchiroli News : ऐन गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई; ४ नक्षलवाद्यांचा खात्मा

Yawal News : यावलमध्ये लाखोंचा गांजा जप्त; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT