Onion And Garlic Price Hike Saam Tv
लाईफस्टाईल

Onion-Garlic Price Hike : टोमॅटो स्वस्त तरीही दिलासा नाहीच, कांदा-लसून महागल्याने गृहिणींचं बजेड कोलमडणार, बघा नवे दर

Onion-Garlic Rate Today (14 Aug) : टोमॅटोनंतर कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या दरात 48 टक्क्यांची वाढ झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Today's Rate Of Onion-Garlic : देशातील महागाई थांबण्याचे नाव घेत नाही. टोमॅटोच्यावाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य लोक पुरते हैरान झाले आहेत. त्यातच आता कांदा-लसणाची फोडणी सर्वसामान्यांसाठी माहागली आहे.

टोमॅटोनंतर कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या (Onion) दरात 48 टक्क्यांची वाढ झाली. बदलत्या वातावरणामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्याने सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर दुप्पट होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

1300 वाहनातून बारा हजार क्विंटल कांद्याची आयात आली होती. त्याला जास्तीत जास्त 2301 रुपये, कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 2100 रुपये इतका क्विंटलला बाजार भाव मिळाले आहे. लासलगाव मार्केटमध्ये दिवसाला सुमारे 20 ते 25 हजार क्विंटल कांदा येतो. मात्र, गेल्या काही दिवसांत हे प्रमाण 15 हजार हजार क्विंटलपर्यंत आले त्यामुळे कांदा महागला.

टोमॅटोप्रमाणेच लसणाचा (Garlic) दरही 170 रुपये किलोच्या पुढे आहे. अनेक शहरांमध्ये लसणाची किंमत 180 रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचली आहे. पाटणामध्ये सध्या एक किलो लसणाचा भाव 172 रुपये आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 178 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. तर तीन ते चार महिन्यांपूर्वी ते खूपच स्वस्त होते.

मार्च महिन्यापर्यंत त्याची किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलोने विक्री होत होती. मात्र मान्सूनच्या आगमनाने तेही महागले आहेत. कांद्याची आवक घटल्याने आणि कांद्याची मागणी वाढल्याने कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने परिणामी कांद्याच्या किरकोळ बाजारातही वाढ झाली आहे.

जिल्ह्यात यंदा 20 लाख क्विंटल लसणाचे उत्पादन झाल्याचे फलोत्पादन विभागाचे उपसंचालक नंदबिहारी माळव यांनी सांगितले की, यंदा जिल्ह्यात सुमारे 30 हजार हेक्‍टरवर लसणाची पेरणी झाली असून, 20 लाख क्विंटल लसणाचे उत्पादन झाले आहे.

3 वर्षातील उच्चांकी भाव

शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात लसणाची विक्री करत आहेत, बाजारात लसणाची चांगली आयात झाल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश बन्सल यांनी सांगितले. यासोबतच दरातही विक्रमी वाढ होत आहे. धनमंडीत सुमारे पाच हजार लसणाची आयात झाली. लिलावादरम्यान लसणाच्या भावाने गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडून 24 हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. बाजारातील व्यापारी जाधवचंद, राजेंद्रकुमार जैन यांनी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून 24 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा लसणाच्या दरात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कमी क्षेत्रात लसणाची पेरणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनातही घट झाली आहे. यंदा मागणीच्या तुलनेत लसणाची उपलब्धता कमी असल्याचे लसूण व्यवसायाचे हरीश विजय यांनी सांगितले. त्यामुळे भाव वाढत आहेत. तसेच मलेशिया, बांगलादेशसह इतर देशांतही यंदा लसणाची मागणी जास्त आहे. त्यामुळे निर्याती लसणाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT