अक्षय बडवे
Tomato Price: राज्यात सर्वत्र टोमॅटोच्या दरांनी उच्चांकी गाठलीये. टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. गेल्या २ महिन्यांपासून वाढत असलेल्या दरांनंतर आता ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात टोमॅटोचे भाव हळूहळू कमी होताना दिसत आहेत. (Latest Marathi News)
टोमॅटोच्या दरात मोठी घट झालीये. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात दर कमी झालेत. १२५ ते २०० रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता ७० ते ८५ रुपयांवर उतरले आहेत.
पुणे बाजार समितीत रविवारी नऊ हजार क्रेटची आवक झाली. नाशिक, पुणे, मुंबई बाजार समितीत आवक वाढली आहे. पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील टोमॅटोचे भाव कमी झाले आहेत.
अचानक टोमॅटोचे भाव निम्म्याने कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे ५० टक्के घट झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो ५० ते ८५ रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला जात आहे.
मागच्या दोन दिवसात 2 ते अडीच हजार रुपये दराने खरेदी केलेला टोमॅटो व्यापाऱ्यांनी आज राज्यातील विविध बाजारपेठमध्ये विक्रिला पाठवला आहे. तेथे निम्म्याने दर कमी झाल्याने हा सगळा तोटा व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.