Ganesh Chaturthi rituals saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2025: 27 ऑगस्टला अनेकांच्या घरी येणार गणपती बाप्पा; पहिल्या दिवशी 'या' गोष्टी जरूर करा

Ganesh Chaturthi rituals: गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होत आहे.

  • बाप्पाची स्थापना शुभमुहूर्तावर करावी.

  • तुळशीपत्र गणपतीला अर्पण करू नये.

हिंदू धर्मात गणेश चतुर्थी हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून हा उत्सव सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. या दहा दिवसांत घराघरात, मंदिरांत आणि मंडपांमध्ये गणरायांची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते.

गणेश उत्सवाचा पहिला दिवस सर्वांत खास मानला जातो कारण त्यादिवशीच बाप्पाचं घरात आगमन होतं. म्हणून या दिवशी काही गोष्टी खास कराव्यात आणि काही टाळाव्यात.

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी या गोष्टी जरूर करा

  • सकाळी सर्वप्रथम घरातील पूजाघर किंवा मंडपाची नीट साफसफाई करून सजावट करावी.

  • यानंतर शुभमुहूर्तावर बाप्पाची मूर्ती स्थापित करावी. या वर्षी गणेश स्थापनेसाठी सकाळी ११:०५ ते दुपारी १:४० हा वेळ अत्यंत शुभ मानला जात आहे.

  • मूर्ती बसवताना संकल्प करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दीड दिवस, पाच, सात किंवा दहा दिवस बाप्पाला घरी ठेवणार असाल, तर त्याचा संकल्प पहिल्या दिवशीच घ्यावा. नंतर ठरलेल्या दिवशी विसर्जन करावं.

  • गणेश स्थापनेसह कलश स्थापना करणंही आवश्यक आहे. गणपतीच्या शेजारी कलश ठेवा. कलशात गंगाजल भरून त्यात सुपारी, अक्षता, कुंकू, नाणी, आंब्याची पानं टाका आणि वर नारळ ठेवा.

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी टाळावयाच्या गोष्टी

चंद्र दर्शन

या दिवशी चंद्र पाहणं अपशकुन मानलं जातं. असं केल्याने कलंक लागू शकतं, असं शास्त्रात सांगितलं आहे.

वादविवाद टाळा

बाप्पाचा आगमनाचा दिवस असल्यामुळे या दिवशी वाद, भांडणं, कटु शब्द टाळावेत. घरात आणि मनात सकारात्मकता ठेवावी.

तुळशी अर्पण करू नये

गणपतीला कधीही तुळशीपत्र चढवू नये. शास्त्रानुसार ते वर्ज्य मानलं गेलं आहे.

मूर्ती एकटी सोडू नये

गणेश स्थापना झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती एकटी ठेवू नये. शक्यतो नेहमी त्यांच्या समोर दिवा, फुलं आणि कुणाचं तरी अस्तित्व असावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Corn Bhaji Recipe : कुरकुरीत, खमंग कॉर्न भजी; फक्त १० मिनिटांत तयार होईल टेस्टी रेसिपी

Thyroid Insomnia Issue : वेळेवर झोप लागत नाहीये? असू शकतो हा गंभीर आजार, वेळीच व्हा सावध

Car Accident : रिंग रोडवर अपघाताचा थरार, अस्थी विसर्जन करून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, २ मुलांसहित ७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: अपहरण झालेल्या नागनाथ नन्नवरेच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

Post Office: पोस्ट ऑफिसची खास योजना, महिन्याला जमा करा ५००० रुपये, ५ वर्षांत होईल ५० हजारांचा नफा

SCROLL FOR NEXT