Ganpati Decoration Ideas Saam Tv
लाईफस्टाईल

Ganpati Decoration Ideas : गणपती बाप्पाच्या आरतीसाठी दररोज या पद्धतीने ताटाची सुंदर अन् अनोखी सजावट करा

Aarti Thali Decoration : यंदा विघ्नहर्ता 19 सप्टेंबरला येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून, त्यांच्या आगमनापूर्वीच सर्व तयारी करावी.

Shraddha Thik

Ganpati Aarti Thali Decoration Design Ideas :

यंदा विघ्नहर्ता 19 सप्टेंबरला येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून, त्यांच्या आगमनापूर्वीच सर्व तयारी करावी, अशी त्यांची इच्छा आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये आरतीचे ताट सर्वात महत्वाचे आहे. मात्र, प्रत्येक वेळी एकाच प्रकारचे आरतीची थाळी सजवणे कंटाळवाणे वाटत असेल तर तुम्ही या विविध प्रकारचे सजवू शकता.

गणेश चतुर्थीच्या सणाच्या (Festival) दिवशी, गणेश पूजा करण्यासाठी आरती थाळी सजवणे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आपण आरतीची थाळी फुलांनी आणि दिव्याने अनेक प्रकारे सजवू शकतो. परंतु, येथे आम्ही तुमच्या बाप्पासाठी सुंदर गणेश आरती थाळी सजावटची डिझाइन आणि कल्पना सूचीबद्ध करत आहोत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. पाहा सविस्तर...

गणेशोत्सव (Ganeshotsav) हा सण आणि उत्सवाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पिस्ताच्या कवचापासून बनवलेल्या कमळाच्या फुलासारखा दिसणारा दिवा आणि आजुबाजूला फूले बनवा. दिवा हा आणखी एक महत्त्वाचा वैशिष्ट्य बनेल. आणि एका अप्रतिम कल्पनेची सुंदर सजावट गणेश उस्तवासाठी थाळी बनेल. अशा प्रकारच्या दिवे आणि फुल बनवून आरतीची थाळी सजवणे ही छान कल्पना आहे.

गणपतीसाठी आरती थाळी सजावटीच्या या काही अत्यंत आश्चर्यकारक कल्पना आहेत. या आरती थाळी सजावटीचा एक अनोखा पैलू म्हणजे पेपर क्विलिंगच्या कलेचा समावेश करा. सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही मणी वापरू शकता. रंगीत मण्यांपासून बनवलेल्या लहान प्लेट्सवर फळे आणि मिठाईने सजवा.

डिझायनर थाली ही सर्वोत्तम कल्पना (Imagine) आहे आणि जर तुम्हाला ती स्वतः बनवायची असेल, तर तुम्हाला फक्त रंगीत कागदांचा संग्रह हवा आहे ज्यामध्ये पानांची, फुलांची आधीच रंगवलेली रचना असेल. आपल्या गरजेनुसार त्यांना चिकटवा आणि सुंदर आरास तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT