Ganeshotsav 2023 Sam Tv
लाईफस्टाईल

Ganeshotsav 2023 : टाकाऊपासून टिकाऊ! काचेच्या बांगड्यांपासून बाप्पासाठी भन्नाट डेकोरेशन; कसं बनवायचं?

Ganpati Decoration 2023 : गणेश उत्सवासाठी आता काहिच दिवस राहिले आहेत, वाजवत गाजवत बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Shraddha Thik

Eco Friendly Decoration :

हिंदू धर्मानुसार विवाहित महिलांनी बांगड्या घालणे आवश्यक मानले जाते. मुलींना देखील एथनिक लुकसाठी बांगड्या घालायला आवडतात. पण काही काळाने बांगड्यांची चमक कमी होते किंवा त्यांचा सेट खराब होतो काही तुटतात तर काही हरवतात आणि त्या पुन्हा घालण्यास अयोग्य होतात. अशा स्थितीत, बहुतेक लोक ते फेकून देतात. पण तुम्हाला माहीत आहे का की या जुन्या आणि निरुपयोगी बांगड्यांनीही तुम्ही बाप्पासाठी खास सजावट करू शकता, पाहूयात कसे.

गणेश उत्सवासाठी आता काहिच दिवस राहिले आहेत, वाजवत गाजवत बाप्पाच्या आगमनासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यातच सगळ्यांची गणपतीच्या (Ganpati) तयारीची धावपळ सुरू आहे. त्यामुळे काही लोकांना वेळ नसल्याने काय सजावट करावी हे सुचत नाही. त्यामुळे लोक शॉर्टकट पद्धतीने सजावट करण्याकडे लक्ष जास्त देतात. अशीच एक शॉर्टकट पद्धत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जाणून घ्या बाप्पासाठी कसे कराल काचेच्या बांगड्यांची सजावट -

साध्या दिव्याला अनोखा लूक द्या

बाप्पाच्या सजावटीत लावणाऱ्या दिव्याला काचेच्या बांगड्यांचा वापर करून नवीन लुक तयार करू शकता. यासाठी रंगीबेरंगी बांगड्या मध्यम आणि लहान आकारात फोडून दिव्यावर चिकटवा. जेव्हा तुम्ही दिवा पेटवाल तेव्हा दिव्याच्या आजुबाजूला असलेल्या कांचाच्यामार्फत प्रकाश (Light) येईल तेव्हा त्या प्रकाशाने खूप सुंदर दिसेल.

बांगड्यांपासून तोरण

तुम्ही तुमचे घर आणि बाप्पाच्या सजवटीसाठी जुन्या बांगड्यांपासून तोरण तयार करू शकता. यासाठी, 3 बांगड्या घ्या आणि त्यांना चमकदार लेसने गुंडाळा आणि त्यांना एकत्र बांधा. तुम्ही 4, 3, 2, 1 च्या क्रमाने एका खाली एक बांगड्या जोडून देखील बनवू शकता. त्याच्या शेवटी एक लहान वेलसारखे लेस खाली सोडा. आता त्याला एका लांब स्ट्रिंगने लटकवा. अशा पद्धतीने तुम्ही आणखीन 4, 5 बनवून घ्या आणि एकत्र करून सजावटीला लावा.

मागच्या पडद्यासाठी टाय बॅक बनवा

पडद्यांच्या सजावटीसाठी टाय बॅकचा वापर करा. खरेतर हे पडदे रेडीमेड येतात. म्हणूनच बहुतेक लोक ते रेडीमेड पडदे विकत घेतात. लोक हे असे पडदे बनवण्यासाठी मधोमध गाठ बांधतात, ज्यामुळे पडदे लहान होतात. अशा वेळी, तुम्ही बांगड्यांपासून पडद्यासाठी टाय बॅक तयार करू शकता. यासाठी 2-3 बांगड्या एकत्र चिकटवून त्यावर रेशमी कापड (Cloths) किंवा धागा गुंडाळून मोत्यांनी सजवा. बाप्पाच्या सजावटीसाठी तुमचे स्वस्तात मस्त पडदेही तयार होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT