Ganesha Visarjan 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Ganesha Visarjan 2024 : गणपती विसर्जनाआधी 'हा' सिंपल उपाय करा; नशीब 100 टक्के फळफळणार

Ruchika Jadhav

गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करणारा देव. त्यामुळे दर वर्षी घराघरात आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होतात. हिच वेळ असते बाप्पाला प्रसन्न करण्याची. विसर्जनाआधी बाप्पाला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मार्गातील सर्व वाईट गोष्टी आणि दुःख दूर करू शकता. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या उपायांची माहिती सांगणार आहोत.

रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे सर्व काही सुरळीत असून देखील काही कामे रखडली जातात. काही केल्या काम पुढे जात नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात देखील असे काही घडत असेल तर रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी विसर्जनाआधी बाप्पाला चार हार आणि चार नारळ अर्पण करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. तसेच रखडलेल्या कामांना वाट मोकळी होईल.

नशीब पालटण्यासाठी

बाप्पा प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकतो. त्यामुळे जर तुमचे नशीब तुम्हाला साथ देत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर विसर्जन करण्याआधी गणेश मूर्तीवर जलाभिषेक करा. त्यानंतर गणपतीला लाडू आणि पुष्प हार अर्पण करत मधुर आवाजात प्रार्थना घ्या.

पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी

जर काही कारणामुळे तुम्हाला पैशांची अडचण भासत असेल तर सर्वात आधी तूप आणि गूळ एकत्र करा. दोन्ही गोष्टी एकत्र करून विसर्जनाच्या दिवशी सकाळी गाईला खाऊ घाला. असे केल्याने बाप्पा तुमच्या मार्गातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर करेल.

रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी

राग प्रत्येक व्यक्तीला येतो. मात्र काही व्यक्ती अगदी शुल्लक कारणावरून देखील प्रचंड क्रोधित होतात. राग वाढल्याने काही व्यक्तींचे त्यांच्याच जवळच्या व्यक्तींशी असलेले संबंध बिघडतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी गणपती बाप्पाला लाल रंगाची फुले अर्पण केली पाहिजेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Maharashtra Assembly Elections: ठाकरे - शरद पवार गटात जागावाटपावरून तिढा? 20 जागांवर अडकली मविआची गाडी? मुंबईतल्या बैठकीत काय झाली चर्चा?

SCROLL FOR NEXT