Ganesh Visarjan 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Ganesh Visarjan 2024 : बाप्पाचे विसर्जन करताना 'या' चुका टाळा; विघ्नहर्ता निराश होऊ शकतो

Ganesh Visarjan 2024 Puja Vidhi : गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत. या चुका केल्याने कुटुंबावर गणराया नाराज होईल. वाचा योग्य पद्धत काय?

Ruchika Jadhav

गणपती बाप्पा 7 स्पटेंबर रोजी आपल्या घरी आला. काही व्यक्ती आपल्या आवडीनुसार आणि केलेल्या नवसानुसार गणपती बाप्पाची स्थापना करतात. यामध्ये काही व्यक्ती दीड दिवसांचे गणपती बसवतात, तर काही व्यक्ती 5 आणि काही ठिकाणी 7 तसेच काही ठिकाणी 10 दिवस बाप्पा विराजमान होतात. बाप्पा घरी आल्याने प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सेवेत रुजू होतो. अशात गणपती विसर्जन करताना देखील काही नियमांचे काटेकोर पालन करणे आपल्या घरासाठी आणि घरातील व्यक्तींसाठी भाग्याचे ठरते.

'या' पद्धतीने करा गणारायाचे विसर्जन

गणपती बाप्पाचे विसर्जन करताना सकाळी लवकर उठून मूर्तीची पूजा करा.

बाप्पाला निरोप देताना दिलेली वेळ लक्षात ठेवा. मुहूर्तावरच गणपती बाप्पाचे विसर्जन झाले पाहिजे.

मूर्ती विसर्जनासाठी घेऊन जाताना ती एका लाकडी पाटावरच ठेवा. मूर्ती लाकडी पाटावर आणि पवित्र केलेल्या ठिकाणीच ठेवावी.

पाटावर मूर्ती ठेवण्याआधी त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरवून ठेवा.

या पाटावर तुम्ही स्वस्तिक काढून हळद आणि कुंकू सुद्धा वाहू शकता.

पुढे गणपती बाप्पाचे विसर्जन करताना बाप्पाला वाजत गाजत घरातून बाहेर घेऊन घ्या.

बाप्पाला घेऊन जाताना मागे काही व्यक्तींनी त्यावर तांदळाचा वर्षाव करावा.

नदी किंवा विसर्जनाच्या ठिकाणी गणपती बाप्पाला घेऊन गेल्यावर तेथे देखील बाप्पाची आरती करा आणि मूर्तीवर चंदन, हळद तसेच कुंकू आणि फुले वहा.

महत्वाचा मंत्र

गणपती बाप्पाचे विसर्जन करताना काही मिनिटे आधी मनात एका मंत्राचा जप करा.

"ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।

इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥"

हा मंत्र फार महत्वाचा आहे. या मंत्राचा जप केल्याने तुमच्या सर्व मनोकामना बाप्पा नक्की पूर्ण करणार.

ही चूक करू नका

गणपती विसर्जन करताना बाप्पाच्या मूर्तीचे तोंड तुमच्या दिशेने ठेवू नका. मूर्तीचे तोंड समोरच्या दिशेने ठेवा.

मूर्ती विसर्जन करताना पूजेचे अन्य साहित्य देखील त्याच पाण्यात विसर्जन करा.

विसर्जन झाल्यावर तेथे उपस्थित सर्व व्यक्तींना प्रसाद वाटायला विसरू नका.

बाप्पाचे विसर्जन अगदी शांततेत आणि चांगल्या मनाने करा. यावेळी कोणत्याही प्रकारे वाद विवाद होणार नाही याची काळजी घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT