Ganeshotsav Travel Saam TV
लाईफस्टाईल

Ganeshotsav Travel : गणपती बाप्पा मोरया! परदेशातही आहेत गणरायाची मंदिरं, तुम्हाला माहित आहेत का ?

Ganeshotsav 2024 : गणपती बाप्पाची परदेशात सुद्धा अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांना तुम्ही सुद्धा यंदाच्या गणेशोत्सवात भेट देऊ शकता.

Ruchika Jadhav

आपली ज्या देवावर श्रद्धा असते तो देव आपल्याला पृथ्वीच्या चराचरात दिसतो असं म्हणतात. भारतात गणपती बाप्पाचे अनेक भक्त आहेत. त्यामुळे हे भक्त जगभरात जिथे जिथे पोहचलेत तिथे तिथे गणरायाची सुंदर मंदिरे उभारण्यात आली आहेत. परदेशातही भारताप्रमाणे पुजारी बाप्पाची मनोभावे सेवा आणि पुजा करतात. त्यामुळे आज परदेशातील आपल्या लाडक्या गणरायाच्या मंदिरांची माहिती जाणून घेऊ.

श्रीलंकेतील मंदिर

श्रीलंका येथे गणपती बाप्पाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथे गणेशाची मनोभावे पुजा केली जाते. अरियालाई सिद्धिविनायककर मंदिर आणि कटारगामा मंदिर अशी या मंदिरांची नावे आहेत. श्रीलंकेतील गणरायाची ही सर्वाधिक प्रसिद्ध मंदिरे आहेत.

कसं जायचं?

अरियालाई सिद्धिविनायकर मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला जाफना शहरात जावे लागेल. 5 किलोमीटर अंतर पार केल्यावर तुम्हाला A9 रोड दिसेल. या रस्त्याच्या पश्चिमेस अरियालाई सिद्धिविनायकर हे प्राचीन मंदिर आहे. 1918 च्या सुमारास अधिवक्ता अरुलमपालम यांनी या मंदिराची बांधणी केली आहे.

थायलंडमधील मंदिर

बाप्पा फक्त श्रीलंकेत नाही तर अगदी थायलंडमध्ये विराजमान झाला आहे. हुआई क्वांग स्क्वेअर नावाचं थायलंडमध्ये बाप्पाचं प्रसिद्ध मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येथे येत असतात. तसेच चियांग माई येथे बाप्पाची एक चांदीची मूर्ती आहे. त्यामुळे या मंदिराला चांदिचे मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मंदिराचा पत्ता काय?

P5PF+5RC, बंग तलत, ख्लोंग खुआन जिल्हा, चाचोएन्गसाओ,थायलंड असा या मंदिराचा पत्ता आहे.

नेपाळमधील मंदिर

नेपाळमध्ये गणपती बाप्पाचे अनेक भक्त आहेत. नेपाळच्या भक्तपूर जिल्ह्यामध्ये सूर्यविनायकाचे मंदिर आहे. हे मंदिर काठमांडूपासून सुमाने २ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नेपाळमधील अनेक व्यक्ती येथे दर्शनासाठी येत असतात.

सूर्यविनायकाच्या मंदिरात कसे पोहचाल?

नेपाळमधील भक्तपूर जिल्ह्यात असलेल्या सूर्यविनायकाच्या मंदिरात जाण्यासाठी भक्तपूर किंवा काठमांडू येथे पोहचावे लागेल. तेथून पुढे तुम्ही रिक्षा किंवा कॅबच्या सहाय्याने या मंदिरापर्यंत पोहचू शकता. सूर्यविनायक मंदिर हे काठमांडूमधील गणपतीच्या प्रसिद्ध चार मंदिरांपैकी एक आहे.

नेदरलँडमधील गणपती मंदिर

नेदरलँडमधील डेन हेल्डरमध्ये येथे गणपती बाप्पाचं सर्वात जुनं मंदिर आहे. श्री वरथराजा सेल्वविनायगर असं या मंदिराचं नाव आहे. नेदरलँडमधील 1991 मध्ये श्रीलंकेतून काही तमिळ नागरीक आले होते. त्यावेळी त्यांनी हे मंदिर बांधलं आहे. प्रत्येक गणेशोत्सवात या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी उफाळून येते.

श्री वरथराजा सेल्वविनायगर मंदिराचा पत्ता

एनी रोमेन-वर्स्चूरलान 32, 1784 एनझेड डेन हेल्डर, नेदरलँड असा या मंदिराचा पत्ता आहे. नेदरलँडला पोहचल्यावर मंदिरापर्यंत तुम्हाला पोहचण्यासाठी अनेक खासगी वाहने मिळतील.

भारतात गणपती बाप्पाची सर्वात जास्त मंदिरे आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, अष्टविनायक मंदिर, मधुर महागणपती मंदिर अशी अनेक प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या गणरायाची मंदिरे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT