Ganesh Chaturthi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2023 : गणरायाला नैवेद्य अर्पण करताना हे नियम नेहमी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर

Offering Food For Ganpati : भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी बाप्पाचा जन्म झाला.

Shraddha Thik

Ganeshotsav 2023 :

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येते, परंतु भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी बाप्पाचा जन्म झाला, जो गणेशोत्सवाच्या नावाने लोक साजरा करतात. जो 10 पूर्ण दिवस साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून सुरू होत असून 10 दिवस गणपतीची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी भक्तगण गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध प्रकारे पूजा करतात.

हे अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण आहे

शास्त्रानुसार प्रत्येक देवतेची पूजा (Pooja) करण्याची पद्धत वेगळी असते. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या विधीपूजनासह उपवास आणि उद्यानपण शुभ मानले जाते. यासोबतच हिंदू धर्मात अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत लोक नैवेद्य अर्पण करताना अनेक चुका करतात, ज्यामुळे देव ते स्वीकारत नाही. तर जाणून घेऊया पुराणानुसार नैवेद्य अर्पण करताना या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.

देवी-देवतांना नैवेद्य अर्पण करताना या नियमांचे पालन करा

हिंदू धर्मात तुळशीच्या (Tulasi) रोपाला विशेष महत्त्व आहे. ही एक पवित्र वनस्पती मानली जाते आणि प्रत्येक घरात तुळशीचे रोप हे असतेच. ज्या घरात हे रोप असते त्या घरात सकारात्मक ऊर्जा जास्त असते. यामुळे या लोकांना सर्व संकटांपासून कायमची मुक्ती मिळते.

तुळशीचा नैवेद्य

ज्योतिषशास्त्रानुसार देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य परमेश्वरापर्यंत लवकर पोहोचतो. पण शंकराप्रमाणे गणरायाला सुद्धा तुळशीचा नैवेद्य अजिबात दाखवला जात नाही.

नैवेद्याचे ताट

देवी-देवतांसाठी जेवण बनवल्यानंतर ते ताटात काढा, पण लक्षात ठेवा की स्वयंपाकघरातच (Kitchen) नैवेद्याच्या ताटात तुळस अजिबात ठेवू नका. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण गणेशाची पूजा केली जाते. यासाठी त्याला प्रथम नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर इतर देवी-देवतांना नैवेद्य दाखवला जातो.

त्यानंतर घरच्या मंदिरात नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या ताटात तुळशीची पान ठेवा. आणि इतर देवी-देवताही भोजन घेतील. याने श्रीगणराया त्यांच्या दर्शनातून नैवेद्य स्वीकारतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT