Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 Saam Tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2022 : भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिरे, या गणेश चतुर्थीला घ्या दर्शन

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: गौरीपुत्र गणेशाला मनोकामना पूर्ण करणारे देवता मानले जाते. हिंदू धर्मानुसार गणपती हा सर्व देवतांमध्ये पूजनीय आहे. कोणत्याही सणाच्या किंवा पूजेच्या वेळी गणपतीचे स्मरण प्रथम केले जात असले तरी भाद्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. हा सण १० दिवसांचा आहे, यामध्ये लोक गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात. गणपती उत्सवानिमित्त एखाद्या गणेश मंदिराला भेट द्यायची असेल, तर भारतात अनेक गणपती मंदिरे आहेत. श्री गणेशाची प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांबद्दल सांगितले जाते. आता आपण पाहणार आहोत देशातील प्रसिद्ध गणेश मंदिरे (Temple). (Ganesh Chaturthi 2022)

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर (Temple) हे सर्वात मोठ्या गणेश मंदिरांपैकी एक आहे. सिद्धिविनायक मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. गणपतीचे हे प्राचीन मंदिर १८०१ मध्ये बांधले आहे.या मंदिरात भक्त प्रामाणिक मनाने येतात. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सेलिब्रिटी आणि राजकारणी अनेकदा या मंदिराला भेट देत असतात.

खजराना गणेश मंदिर, इंदूर

खजराना गणेश मंदिर मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहे. हे स्वयंभू मंदिर आहे. देशातील सर्वात श्रीमंत गणेश मंदिरांमध्ये खजराना मंदिराचे नाव समाविष्ट आहे. येथे भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक येथे येतात आणि गणेशमूर्तीच्या पाठीवर उलटे स्वस्तिक बनवतात. या मंदिरात गणेशाची तीन फूट उंचीची मूर्ती असून ती विहिरीतून बाहेर काढण्यात आली आहे, असं बोलले जाते.

रणथंबोर गणेश मंदिर, राजस्थान

राजस्थानातील रणथंबोर येथे बांधलेले हे गणेश मंदिर (Temple) केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले गणेश मंदिर मानले जाते. या मंदिरात गणेशाची त्रिनेत्री मूर्ती आहे. १००० वर्षांहून अधिक जुने हे मंदिर रणथंबोर किल्ल्यातील सर्वात उंचावर बांधले आहे. विशेष बाब म्हणजे हे गणेश मंदिर राजस्थानमधील पहिले आहे.

डोडा गणपती मंदिर, बंगळुर

दक्षिण भारतातील सर्वात आश्चर्यकारक मंदिरांपैकी एक म्हणजे गणेशजींचे डोडा गणपती मंदिर. दोडा म्हणजे मोठा. त्यांच्या नावाप्रमाणेच, बंगळुरमध्ये असलेल्या या मंदिरात १८ फूट उंच आणि १६ फूट रुंद गणेशाची मूर्ती आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती काळ्या ग्रॅनाइटच्या एकाच खडकावर कोरण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : हेमंत गोंडसेंच्या उमेदवारीला छगन भुजबळांचा विरोध का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ६ मे रोजी दोन सभा

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा हार; सोनाली दिसतेय फारच छान

SRH vs RR: हैदराबादचं वादळ रोखण्यासाठी काय असेल राजस्थानचा 'रॉयल' प्लान? अशी असू शकते प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT