March 2025 Triple Rajyog saam tv
लाईफस्टाईल

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Gajakesari-Kalatmak RajYog 2025: १८ ऑगस्ट २०२५ रोजी, ज्योतिषीय दृष्टिकोनातून एक अतिशय शुभ काळ सुरू झालं आहे. यावेळी गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग आणि शनिच्या कृपेमुळे कलात्मक राजयोग तयार झाले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक पंचांगानुसार ग्रह जेव्हा एकमेकांशी युती करतात, तेव्हा अनेक शुभ योग आणि राजयोगांची निर्मिती होते. याचा परिणाम थेट माणसांच्या आयुष्यावर आणि जगभरातील घडामोडींवर होत असतो. काल म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी चंद्रमाही मिथुन राशीत प्रवेश केला आहे.

या तीन ग्रहांच्या संयोगामुळे कलात्मक आणि गजकेसरी राजयोग निर्माण होत असून त्याचा प्रभाव सर्व राशींवर होणार आहे. मात्र यामध्ये तीन राशी अशा आहेत ज्यांचे भाग्य या काळात विशेष उजळू शकते, अचानक धनलाभ होऊ शकतो तसेच परदेश किंवा लांबच्या प्रवासाचे योग जुळू शकतात. पाहू या त्या तीन राशी कोणत्या आहेत.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. कारण ही युती तुमच्या भाग्यभावात होत आहे. त्यामुळे नशिबाची साथ लाभणार असून कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासह एखाद्या सहलीला जाण्याची संधी मिळू शकते. या काळात जुने मित्र भेटतील, ज्यामुळे आनंद वाढेल. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनाही यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठीही हा योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कामकाजात मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळणार आहे. विशेषतः परदेश व्यापाराशी संबंधित लोकांना जास्त फायदा होणार आहे. नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळणार आहे. तुमची नेतृत्वक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य या काळात प्रभावीपणे दिसून येईल.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी तर हा राजयोग अगदी खास आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. या काळात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याचप्रमाणे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात. घरातील नाती अधिक मजबूत होतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

Vijay Deverakonda : "डोके दुखतंय..."; कार अपघातानंतर विजय देवरकोंडाची पहिली प्रतिक्रिया

सलमानला पोलिसांनी सिनेस्टाईल पकडलं; पनवेलमध्ये गुन्हा करून फरार, आरोपीचे कल्याणमध्ये मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

SCROLL FOR NEXT