Friendship Day 2024  SAAM TV
लाईफस्टाईल

Friendship Day 2024 : स्वस्तात मस्त युनिक गिफ्ट आयडिया, दोस्त होतील खुश

Unique Gift Ideas : मैत्री हे जगातील खूप खास नातं आहे. आयुष्यात प्रत्येकाचा एक जिवलग मित्र असतो. तर मग यंदा 'फ्रेंडशिप डे' ला मित्रांना 'या' भन्नाट भेटवस्तू द्या आणि आपले प्रेम व्यक्त करा.

Shreya Maskar

यंदा ४ ऑगस्टला 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जाणार आहे. मैत्री हे जगातील सर्वात सुंदर आणि खास नातं आहे. खरा मैत्री मिळणे खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या जीवनात असा एक मित्र नक्की असतो. जो चांगल्या-वाईट प्रसंगात त्यांच्या सोबत उभा राहतो. एका फोनवर सर्व काम सोडून धावत येतो. मैत्री हे रक्तच नातं जरी नसल तरी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठ आणि खरं असतं. कोणतीही अपेक्षा न करता कायम साथ देणाऱ्या मित्रांना 'फ्रेंडशिप डे' ला 'या' खास भेटवस्तू देऊन तुमचे प्रेम व्यक्त करा.

पुस्तक

तुमच्या मित्राला जर वाचनाची आवड असेल तर, तुम्ही त्यांना आवडत्या लेखकाची आणि त्यांच्या आवडत्या वाचन प्रकारातील छान पुस्तके देऊ शकता. तसेच तुम्ही त्यांना एखाद्या ग्रंथालयाचे सदस्‍यत्‍व घेऊन द्या.

मोबाईल - लॅपटॉप स्टॅण्ड

आजकाल मोबाईल आणि लॅपटॉप शिवाय काम अशक्य झाले आहे. अशात जर तुम्ही तुमच्या मित्रांना मोबाईल - लॅपटॉप स्टॅण्ड दिला तर काम करताना त्यांना देखील आराम मिळेल. प्रत्येक क्षणी तुमची आठवण काढतील.

ज्वेलरी बॉक्स

मुलींकडे असंख्य ज्वेलरी असतात पण ती नीट ठेवायला ज्वेलरी बॉक्स नसतो. तर या फ्रेंडशिप डे ला तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मोठा ज्वेलरी बॉक्स गिफ्ट करू शकता.

किचेन गिफ्ट

तुमच्या मित्राकडे गाडी असेल किंवा त्याला किचेन गोळा करण्याचा छंद असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे, स्टाइलचे किचेन गिफ्ट करू शकता.

टोट बॅग

तुमच्या मैत्रिणीला छान टोट बॅग गिफ्ट करा. कारण आजकाल हा फॅशन ट्रेंड चालू आहे. टोट बॅग तुम्ही मैत्रिणीच्या आवडीनुसार कस्टमाईज देखील करू शकता.

ब्युटी प्रोडक्ट्स किट

आजकाल मुलगी असो किंवा मुलगा चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी दोघही ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना ब्युटी प्रोडक्ट्स किट भेट देऊ शकता.

परफ्यूम

मुंबईसारख्या धावपळीच्या जगात सुगंधी राहणे कोणाला नाही आवडणार. यामुळे तुमच्या मित्रांना छान सुगंधी परफ्यूम गिफ्ट करा. तुमच्या प्रेमाचा सुगंध त्यांच्या सोबत कायम राहील.

फोन कव्हर

२४ तास आपल्या हातात मोबाईल असतो. बाजारात विविध प्रकारचे स्टायलिश फोन कव्हर उपलब्ध असतात. मात्र तुम्ही तुमच्या मित्रांच्या फोटोचे कस्टमाईज फोन कव्हर त्यांना भेट वस्तू म्हणून देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT