Breathing problem  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : अचानक श्वास घेण्यास त्रास होतोय? अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ ठरतील रामबाण !

श्वास घेताना त्रास होतोय हे उपाय करुन पहा

कोमल दामुद्रे

Health Tips : आपण चालताना किंवा पळताना आपल्याला धाप लागते व श्वास घेण्यास त्रास होतो. परंतु, हे सामान्य वाटत असले तरी आपल्या आरोग्यासाठी हे तितके चांगले नसते.

कधी कधी शिड्या चालताना किंवा काही अतिरिक्त जड काम करताना आपल्याला त्रास होतो. श्वासोच्छवासाची समस्या शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा श्वसनाच्या आजारांमुळे उद्भवते.

श्वसनसंस्थेत संसर्ग झाला तरी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. हृदयविकार, ऍलर्जी आणि अशक्तपणा ही इतर कारणे आहेत ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. परंतु, काही वेळा आपण घरी असताना आपल्याला श्वास घेण्यास अधिक त्रास होतो.

सर्दी किंवा खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार झाल्यानंतरही आपल्या श्वास घेण्यास त्रास होतो. त्यासाठी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करायला हवा. ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास मदत होईल व या समस्यापासून सुटका देखील होईल जाणून घ्या.

१. लिंबूपाणी -

Lemon Water

लिंबामध्ये जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट्स असते. याचे सेवन केल्याने फुफ्फुसे निरोगी राहतात आणि श्वास घेण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास लिंबूपाणी प्या. लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीर डिटॉक्स होईल व आपल्याला आराम मिळेल.

२. आले -

Ginger

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आल्याचे सेवन करा. आल्याचे सेवन केल्याने श्लेष्मा बाहेर पडतो आणि श्वास घेण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. आल्याचा छोटा तुकडा चघळून खा. आल्याचा चहाही आपण घेऊ शकतो. आल्याचे डेकोक्शन बनवूनही आपण पिऊ शकतो.

३. बडीशेप -

Fennel

सतत दम लागत असेल तर बडीशेपचे सेवन करा. बडीशेप श्लेष्मा काढून टाकते आणि श्वासोच्छवासाची समस्या दूर करते. बडीशेप चावून किंवा त्याचे पाणी पिऊन आपण त्याचे सेवन करु शकतो. बडीशेप भाजूनही खाता येते.

४. ब्लॅक कॉफी -

Black Coffee

श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्यास ब्लॅक कॉफी (Coffee) प्या. कॉफी चवीला चांगली असते आणि कॅफिनचे सेवन केल्याने श्वसनमार्गामध्ये उपस्थित स्नायूंना आराम मिळतो. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, मर्यादित प्रमाणात कॉफी घ्यावी.

५. सफरचंद -

Apple

फुफ्फुसातील आजारामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. यापासून मुक्त होण्यासाठी सफरचंद खा. सफरचंदामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क व ई असते. जे फुफ्फुसांना निरोगी ठेवते आणि श्वासोच्छवासाच्या समस्येपासून मुक्त होते.

धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्ही धूम्रपान टाळावे. यासोबतच नियमित व्यायाम केला पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच

Ladki Bahin Yojana: १ लाख ४ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद; मिळणार नाही १५०० रुपये; यादीत तुमचं नाव आहे का?

independence day 2025 : 'मांस विक्रीचे फतवे नंपुसक करायचे'; मांसाहार बंदीवरून महायुतीत मतभेद,VIDEO

Thursday Horoscope : तुमचा साधेभोळेपणा इतरांना भावणार; ५ राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

Dhananjay Munde : मुंबईत कोट्यवधींचं घर; मुंडे मात्र 'सातपुडा'वर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT