Food Allergy In Children  Saam Tv
लाईफस्टाईल

Food Allergy Guidelines : मुलांना फूड ऍलर्जीपासून वाचवण्यासाठी कशी घ्याल काळजी?

Child Health : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांना फूड ऍलर्जी होऊ शकते. जगभरातील सुमारे चार टक्के मुले फूड ऍलर्जीने ग्रस्त आहेत. मुलांमध्ये ही समस्या सामान्य आहे. मुलांनी एकमेकांच्या टिफीनमधले खाल्ल्याने देखील त्यांना फूड ऍलर्जीचा त्रास होतो.

कोमल दामुद्रे

Kids Build Tolerance To Food Allergy :

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मुलांना फूड ऍलर्जी होऊ शकते. जगभरातील सुमारे चार टक्के मुले फूड ऍलर्जीने ग्रस्त आहेत. मुलांमध्ये ही समस्या सामान्य आहे. मुलांनी एकमेकांच्या टिफीनमधले खाल्ल्याने देखील त्यांना फूड (Food) ऍलर्जीचा त्रास होतो.

ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये बहुतेक मुलांना शेंगदाण्यापासून ऍलर्जी आहे तर काहींना गहू, अंडी आणि दूध यांच्या ऍलर्जीचा धोका जास्त आहे. यासाठी संशोधकांनी मुलांसाठी (Child) काही गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल

फूड ऍलर्जीमुळे अंगावर पित्त उठणे, तोंडाला खाज सुटणे, दमा, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात गडबड होणे, श्वास घरघर येणे, रक्तदाब कमी होणे, उलट्या होणे यांसारख्या समस्यांचा त्रास होतो.

1. मुलांची ओरल थेरपी करा

ओरल थेरपी ही सर्वात आधी १९०८ मध्ये करण्यात आली होती. सायन्स डेलीच्या वृत्तानुसार कॅनडच्या मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, ओरल इम्युनिटी थेरपी दरम्यान लहान मुलांना ऍलर्जी निर्माण करणारे पदार्थ खूप कमी प्रमाणात दिले जातात. याचे प्रमाण हळूहळू वाढवले जाते. ऍलर्जीने ग्रस्त असलेल्या मुलांना तोंडी इम्युनोथेरपी अधिक चांगल्या प्रकारे प्रदान करण्यास सक्षम असतील.

  • मुलांना योग्य आहार कसा द्यायचा हे देखील पालकांना शिकायला हवे. तसेच काही गोष्टींची काळजी घ्यावी.

  • पालकांनी मुलांना हळूहळू ऍलर्जीक पदार्थाच्या संपर्कात आणयला हवे.

  • जर तुमच्या कुटुंबात पूर्वी पासून ऍलर्जीची समस्या असेल तर मुलांची तोंडी इम्युनोथेरपी करुन घ्यावी.

  • ऍलर्जीमुळे मुलांना पोटदुखी आणि उलट्या यांसारखी सामान्य लक्षणे दिसतात.

  • मुलांच्या बाबत कोणतीही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT