मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना पुस्तकांची आवड आहे. आपल्यातकडे कितीही पुस्तके असली तरी ती आपल्याला कमीच वाटतात. बऱ्याचदा पुस्तके खरेदी करताना आपल्या महिन्याच्या खर्चात कपात करावी लागते.
हे देखील पहा -
पैसे वाचवण्यासाठी आपल्याला पुस्तके वाचण्याची सवय मोडावी लागणार नाही,यासाठी आपण काही सोप्या युक्त्याचा वापर करणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या आवडीचे पुस्तक कमी पैशात अगदी सहज खरेदी करू शकता.
पुस्तक खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा-
१. सध्याच्या युगात अनेक ठिकाणी पुस्तकांच्या देवाणघेवाणीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात मुलांच्या (Child) अभ्यासाच्या पुस्तकांपासून ते इतर अनेक प्रकारच्या पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते. आपण अशा कार्यक्रमाचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करा.
२. आपण वाचलेली पुस्तके किंवा आपल्या उपयोगाची नसलेली पुस्तके देवाणघेवाणीच्या कार्यक्रमांना देऊन टाका. आपली आवड आणि गरज लक्षात घेऊन मग इतर पुस्तके घ्या.
३. काही आँनलाइन साईट्स किंवा पुस्तकांच्या दुकानात सेकंड हँड बुक मिळतात याच्या मदतीने आपण कमी पैश्यात बुक खरेदी करु शकतो. तसेच सेकंड हँड पुस्तकांची खरेदी आणि विक्री देखील करता येते. सेकंड हँड पुस्तके सहसा अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात.
४. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडत असतील आणि ती खरेदी करण आपल्याला परवडत नसेल आपण लायब्ररी कार्ड खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आपल्याकडे असू शकतो. तसेच काही लायब्ररीमध्ये सभासदांना कमी किमतीत पुस्तके खरेदी करण्याचा पर्यायही दिला जातो.
५. आजचे युग डिजिटलचे असून त्यावर अनेक पुस्तके (Books) ऑनलाइनही (Online) पध्दतीने उपलब्ध आहेत. आपल्याला कमी पैसे खर्च करून पुस्तके वाचण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण मोफत ई-बुक्सचा पर्याय निवडू शकतात. तसेच अनेक अँप्स देखील उपलब्ध आहेत, जे अगदी कमी किमतीत सबस्क्रिप्शन देतात आणि त्यावर आपण अमर्यादित पुस्तके वाचू शकतो.
अशाप्रकारे आपण पुस्तके खरेदी करु शकतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.