Surya Namaskar Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Namaskar : सूर्यनमस्कार करण्याआधी 'या' टिप्स फॉलो करा, बॉडी होईल फ्लेक्झिबल !

Morning Yoga : या पद्धतीने सूर्यनमस्कार घालून तुम्ही तुमची बॉडी फ्लेक्सिबल बनवू शकता.

कोमल दामुद्रे

Sury Namskar Benefits : बिझी लाईफस्टाईलमुळे अनेक व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी करणे विसरून गेले आहेत. अशातच जर तुम्ही सूर्यनमस्कार केला तर, तुमच्या शरीराच्या अनेक समस्या दूर होतील.

तुमची बॉडी जर टाईट असेल आणि तुम्हाला आसन करण्यास अडथळा निर्माण होत असेल तर, या पद्धतीने सूर्यनमस्कार घालून तुम्ही तुमची बॉडी फ्लेक्सिबल बनवू शकता.

1. मेडिटेशन करा :

सूर्यनमस्कार (Surya namaskar) करण्याआधी तुम्हाला मेडिटेशन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला एका मॅटवरती पद्मासनमध्ये बसून दोन्ही हातांना इंटरलॉक करून उचलायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीला वरच्या बाजूस खेचायचे आहे आणि वीस सेकंद होल्ड करून ठेवायचे आहे. त्यानंतर हाताना खाली घेऊन तुम्ही रिलॅक्स व्हा. असं केल्याने तुमचं मन आणि तुमचे शरीर असं करण्यासाठी तयार होतात.

2. या पाच टिप्स वापरून करा सूर्यनमस्कार :

  • तुम्ही एका खुर्चीवरती बसून पाय मोकळे सोडा. त्यानंतर पाय पुढच्या दिशेला करून शेक करा. त्यानंतर पाय पुढे मागे हलवत रहा.

  • आता तुम्ही तुमच्या पंजांना आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी स्ट्रेच करून घ्या.

  • त्यानंतर तुम्ही तुमच्या पंजांना क्लॉकवाईज रोटेट करा.

  • आता तुम्ही बटरफ्लाय पोज करा. या पोस्टसाठी तुम्हाला दोन्हीही पंजे स्वतःच्या जवळ आणून फुलपाखरासारखे पाय बनवायचे आहे. आणि त्यानंतर बटरफ्लाय पोज करायची आहे.

  • आता तुमच्याकडून गुडघ्यांना उचला आणि जमिनीवरती नीट ठेवा.

3. अशा पद्धतीने करा सूर्य नमस्कार :

1. प्राणामासन :

सर्वात आधी एका मॅट वरती उभे रहा. त्यानंतर दोन्ही हातांना आपल्या छातीजवळ आणून प्रणाम मुद्रा बनवा. दीर्घ श्वास घेऊन डोळे (Eye) बंद करा आणि प्रार्थना करा.

2. हस्तउत्तनासन :

दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात उचलून डोक्यावरती घ्या. त्यानंतर दोन्ही हातांना प्रणामच्या मुद्रेमध्ये आणून मागील बाजूस थोडसं वाका.

3. पादहस्तासन :

त्यानंतर हळूहळू श्वास सोडत टेबल टॉप पोझिशन बनवून पुढच्या बाजूस वाका. नंतर तुमच्या हातांनी पायांच्या बोटांना स्पर्श करा.

4. अश्व संचालनासन :

दीर्घ श्वास घेऊन तुमच्या हातांच्या पंजाना जमिनीवरती ठेवा. त्यानंतर एक पाय मागील बाजूस घेऊन गुडघा जमिनीवर ठेवा. त्यानंतर दुसऱ्या पायामध्ये वाका आणि पुढील बाजूस उठून समोर बघा.

5. दंडासन :

आता दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हातांना आणि पायांना सरळ करा. एका लाईनमध्ये पुशअप करण्याच्या अवस्थेमध्ये या. काही वेळ होल्ड करा.

6. अष्टांग नमस्कार :

तुमचे पंजे, छाती, गुडघे, हळूहळू जमिनीवरती ठेवा. या अवस्थेमध्ये काही वेळ होल्ड करा.

7. भुजंगासन :

आता दोन्ही हातांना जमिनीवरती ठेवून शरीराच्या पुढच्या भागाला पुढे सरकवा. या मुद्रेला काही वेळ (time) होल्ड करा.

8. अधोमुख शवासन :

त्यानंतर तुम्ही तुमच्या दोन्ही पायांना जमिनीवरती सरळ ठेवा. तुमच्या सीटला वरच्या बाजूस उचला. त्यानंतर खांदे सरळ ठेवून नाभीकडे पहा. नंतर पूर्ण असं पुन्हा करा आणि हे चक्र पूर्ण करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT