Beauty tips, Monsoon care tips, Skin care
Beauty tips, Monsoon care tips, Skin care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Beauty tips : पावसाळ्यात असा करा मेकअप दिसाल सुंदर !

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळ्यात छत्री, जॅकेट किंवा भिजण्यापासून स्वत:चे कितीही संरक्षण केले तरीही आपण भिजले जातो. अशावेळी आपण जर मेकअप केला असू तर तो पसरू शकतो.

हे देखील पहा -

सुंदर दिसण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. चेहऱ्याला काहींना काही लावयाचे आपले काम सुरूच असते. मेकअपपासून ते घरगुती उपायापर्यंत सगळ काही सुरु असते परंतु, हा मेकअप पावसाळ्यात करण्यासाठी आपण घाबरत असतो, तो पसरेल का ? किंवा तो पसरल्यावर आपला चेहरा खराब दिसेल असे अनेक प्रश्न मनात येत असतात. आपण योग्य पध्दतीने मेकअप केल्यास तो पावसाळ्यात पसरणार देखील नाही व आपण सुंदर देखील दिसू शकतो त्यासाठी काही टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे.

१. पावसाळ्यात आपण वॉटर प्रूफ किंवा वॉटर रेझिस्टंट मेकअप उत्पादनाचा वापर करायला हवा. आपण पावसाळ्यात भिजलो तरी, आपला मेकअप खराब होणार नाही.

२. पावसाळ्यात चेहऱ्यावर पावडर बेस्ड मेकअप प्रोडक्ट लावायला हवा व डोळ्यांसाठी क्रीम बेस्ड आयशॅडो निवडायला हवे. आय लायनर लावण्यासाठी पेन लाइनरचा वापर करा. पावसाळ्यासाठी पेस्टल किंवा बेज शेड्सचा आय मेकअप निवडा.

३. जर आपण मेकअपमध्ये ब्लश वापरत असू तर क्रीम बेस्ड ब्लशचा वापर करायला हवा. ते लावायलाही सोपे असते आणि ओले झाल्यावर जास्त पसरतही नाही.

४. पावसाळ्यात लिप ग्लॉस किंवा क्रीमी लिपस्टिकऐवजी लिप पेन्सिल किंवा मॅट लिपस्टिक निवडा. पावसाळ्यासाठी आपण गुलाबी किंवा सॉफ्ट ब्राऊन शेडची लिप पेन्सिल वापरू शकता.

५. पावसाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावर भरपूर तेल येते, त्यामुळे चेहऱ्यावरचा मेकअप जास्त काळ टिकत नाही.पावसाच्या दिवसात मेकअप करण्यासाठी प्राइमरचा वापर करायला हवा. प्राइमर लावल्याने चेहऱ्यावर तेल कमी पडते आणि मेकअप बराच काळ टिकतो.

६. पावसातही मॉइश्चरायझरचा वापर करावा, कारण त्वचेचे पाणी आतून कोरडे होऊन त्वचा कोरडी होते. त्यासाठी हे खूप प्रभावी ठरते.

७. पावसाळ्याच्या दिवसात चेहरा (Skin) आणि डोळ्याजवळ (eye) ओलावा निर्माण होतो. साधा मस्करा लावल्याने मस्करा डोळ्यांमध्ये पसरतो, ज्यामुळे डोळे काळे आणि खराब दिसतात. पावसाळ्याच्या दिवसात वॉटरप्रूफ मस्करा लावावा. यामुळे मस्करा डोळ्यांमध्ये पसरणार नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

Health Tips: महिलांसाठी मेथीचे पाणी ठरते वरदान, का प्यावे घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT