Early Signs of Thyroid Upon Waking saam tv
लाईफस्टाईल

Thyroid Symptoms Morning : सकाळी उठताच दिसून येतात थायरॉईडची ५ लक्षणं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Early Signs of Thyroid Upon Waking : सकाळी उठल्यावर तुम्हालाही थकवा वाटतो का? जर सलग काही दिवस तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर सावध व्हा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्याला कोणतीही समस्या असेल तर शरीर त्याचे संकेत तुम्हाला देत असतं. जर तुम्हाला सकाळी उठून थकल्यासारखं, सुस्त किंवा विचित्र वाटत असेल तर सावध व्हा. अनेक जणं या लक्षणांना कमी झोप किंवा ताण समजून पुढे चालतात. मात्र ही लक्षणं थायरॉईडच्या समस्येची असू शकतात.

आज या आर्टिकलमधून आम्ही तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहोत ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. शरीरात असणाऱ्या थायरॉईडच्या समस्येची काय लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

सकाळी थकवा जाणवणं

पुरेशी झोप घेतल्यानंतर देखील तुम्हाला सकाळी थकल्यासारखं किंवा सुस्त वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ थायरॉईड हार्मोनमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षण आहे.

चेहऱ्याला सूज येणं

सकाळी उठल्यावर जर तुमच्या डोळ्यांना सूज आली असेल किंवा चेहरा अचानक भारी जाणवत असेल तर ते थायरॉईडचं लक्षणं असू शकतं. हे लक्षण दिसल्यास वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

केस गळती

आजकाल लाईफस्टाईलमुळे केस गळतीची समस्या अनेकांमध्ये दिसून येतेय. मात्र जर वारंवार ही समस्या त्रास देत असेल तर सावध व्हा. कारण थायरॉईडच्या असंतुलनामुळे अधिक प्रमाणात केस गळतीची समस्या जाणते. याशिवाय केस रूक्षही होऊ लागतात.

सकाळी मूड स्विंग्स

जर सकाळी उठल्यानंतर फ्रेश होऊन देखील तुमचं काहीही करण्याचा मूड नसेल किंवा दररोज सकाळी हे मूड स्विंग्स जाणवत असतील तर ही चिंतेची बाब आहे. यावेळी थायरॉईडसोबत मानसिक आरोग्यही तुम्हाला तपासावं लागणार आहे.

वजनात बदल होणं

थायरॉईडमुळे अचानक मेटाबॉलिझ्म बिघडू शकतं. यावर परिणाम झाला की वजन वाढणं किंवा घटणं या तक्रारी उद्भवतात. जर सकाळच्या वेळी हे बदल दिसले तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT