Stomach Cancer Early Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Stomach Cancer Early Symptoms: पोटाचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ महत्त्वाचे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Gastric cancer: दरवर्षी जगभरात लाखो लोक पोटाच्या कॅन्सरचे बळी ठरतात. पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रिकचा कॅन्सर म्हणतात. या कॅन्सरची कोणती लक्षणं दिसून येतात ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये कॅन्सर आता कमी वयात देखील होताना दिसतोय. कॅन्सरचे विविध प्रकार असून पोटाच्या कॅन्सरला गॅस्ट्रिक कॅन्सर म्हटलं जातं. हा कॅन्सर पोटाच्या आत ट्यूमर पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. जगभरात लाखो लोक पोटाच्या कॅन्सरमुळे आपला जीव गमावतात.

पोटाच्या कॅन्सरची लक्षणं इतकी सामान्य आहेत की बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र जर या कॅन्सरची लक्षणं वेळीच लक्षात आली आणि त्यावर उपचार केले तर हा आजार बरा होण्यास मदत होते. या कॅन्सरची लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात.

पोटात वेदना होणं

पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीला पोटात तीव्र वेदना आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. पोटाच्या वरच्या भागात सतत वेदना होणं हे पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर तुम्हाला सकाळच्या वेळी या वेदना होत असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

ब्लोटींगचा त्रास

पोट फुगीचा त्रास म्हणजे ब्लोटींग हे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे होण्याची शक्यता असते. जर पोट फुगण्याचा म्हणजेच ब्लोटींगचा त्रास बराच काळ होत असेल तर ते पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. जर पोट नेहमीच फुगलेलं वाटत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.

उल्टी आणि मळमळ

जर तुम्हाला सतत उल्टी आणि मळमळ सारखा त्रास होत असेल तर हे कॅन्सरचं मोठं लक्षण मानलं जातं. अशावेळी तुम्ही तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

शौचातून रक्तस्राव होणं

शौचादरम्यान तुम्हाा रक्तस्राव होत असेल तर अजिबात वेळ न घालवता तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. यावेळी विष्ठेचा रंग लाल असेल किंवा रक्तस्राव होत असेल तर हे पोटाच्या कॅन्सरचं लक्षण मानलं जातं. ही समस्या गंभीर होण्यापूर्वी त्यावर उपचार केले पाहिजेत.

छातीत सतत जळजळ

छातीत जळजळ आणि वेदना हे देखील पोटाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. पोटाच्या कॅन्सरचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे छातीत जळजळ आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे जर तुम्हाला हे लक्षण दिसत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

SCROLL FOR NEXT