सध्याच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे लोकांना निरोगी जीवनशैली राखणे खूप कठीण होत आहे. तंदुरुस्त आणि निरोगी लोक सहजासहजी आजारी पडत नाहीत, त्यांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत राहते, त्यांच्यावर लवकर चरबी चढत नाही आणि ते दिवसभर खूप उत्साही राहतात. प्रत्येकाला तंदुरुस्त दिसण्याची आणि निरोगी (Healthy) राहण्याची इच्छा असते. त्यासाठी काही बदल करणे गरजेचे आहे.
लोकांना असे वाटते की, तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांना अनेक कठीण नियम (Rules) आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करावे लागेल. पण असे नाही, खरे तर अशी कोणतीही जीवनशैली किंवा नियम नाही ज्यामुळे तुम्हाला तंदुरुस्त करता येईल. परंतू फक्त तुमच्या जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.
आपले शरीर अॅक्टिव्ह ठेवा
आजकाल लोक आपला जास्तीत जास्त वेळ बसण्यात घालवतात आणि जास्त बसल्यामुळे किंवा झोपून राहिल्याने शरीरात चरबी जमा होऊ लागते. जर तुम्हाला रोजचा व्यायाम करायला आणि योगासने करता येत नसतील तर थोडा वेळ चालत जाऊन तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. यासोबतच जास्त वेळ एकाच स्थितीत राहणे टाळावे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज किमान अर्धा तास चालावे. तसेच, तंदुरुस्त राहण्यासाठी, तुम्ही काही मैदानी खेळ खेळू शकता आणि लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करू शकता.
हेल्दी पदार्थ
हेल्दी पदार्थ खाण्याची सवय तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास खूप मदत करते. तंदुरुस्त राहणाऱ्या लोकांमध्ये आढळणारी एक सामान्य सवय म्हणजे ते कधीही विचार न करता जेवत नाहीत. ते संतुलित आहार ठेवतात. तंदुरुस्त व्यक्तींनी खाल्लेल्या अन्नाचे प्रमाण ठरलेले असते. ते नेहमी एक साधा नियम अवलंबतात तो म्हणजे ते सर्व पदार्थाचे सेवन करतात. पण मर्यादित प्रमाणात, यामुळे शरीरातील चरबी वाढत नाही आणि शरीर देखील तंदुरुस्त आणि निरोगी राहते. त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि मर्यादित प्रमाणात खा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे अति खाऊ नका आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाश्ता करायला विसरू नका.
झोप
तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आणि सकस आहारासोबत झोपेची गुणवत्ताही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. रात्री वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी वेळेवर उठा. चांगली झोप केवळ शरीराला विश्रांती देत नाही तर ती आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि एकंदर आरोग्यासाठीही चांगली असते. इतकंच काय, आपण वेळेवर झोपलो की आपण सकाळी थोडे लवकर उठू शकतो. आणि थोडे लवकर उठून आपण व्यायाम आणि ध्यानासाठी वेळ काढू शकतो. तुम्हाला नाश्ता करायलाही पुरेसा वेळ मिळेल.
मानसिक आरोग्य
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य राखणेही प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि आजच्या जीवनशैलीत ताणतणाव हे अगदी स्वाभाविक आहे, पण या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे आपण जाणून घेतले पाहिजे. यासाठी तणावाचे व्यवस्थापन करा आणि तणाव व्यवस्थापन तंत्राचा सराव करा. यासाठी तुम्ही माइंडफुलनेस आणि मेडिटेशन देखील करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.