Crying for stress relief saam tv
लाईफस्टाईल

Mumbai Crying Club: मुंबईमध्ये सुरु झाला पहिला 'क्रायिंग क्लब'; तणावापासून मुक्तता मिळवण्यासाठी घेतली जाते जपानच्या प्रथेची मदत

Crying for stress relief: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावाखाली आहे. काम, नातेसंबंध, आर्थिक समस्या यांमुळे अनेकदा मानसिक ताण वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या दगदगीच्या, स्पर्धात्मक आणि सतत काहीतरी मागत राहण्याच्या जीवनशैलीत माणसाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची फारशी संधी मिळत नाही. आपल्या वेदना दाखवणं, रडणं किंवा असुरक्षित वाटणं हे अनेकदा लाजिरवाणं मानलं जातं. पण भारतातील महानगरांमध्ये एक वेगळीच मोहीम सुरू झाली आहे. ‘क्रायिंग क्लब्स’ म्हणजेच रडण्यासाठी विशेष जागा उघडली जातेय.

जपानमधील ‘रुइकात्सू’ या प्रथेतून प्रेरणा घेऊन हे क्लब्स आता भारतात लोकप्रिय होताना दिसतायत. मुंबईमध्ये देखील हे सुरु झालं आहे. तर दिल्ली आणि बेंगळुरूत आधीच असे क्लब्स सुरू झाले आहेत. सुरतमध्ये २०१७ पासून ‘हेल्दी क्रायिंग क्लब’ नावाचा उपक्रम दर महिन्याला एकदा लोकांना एकत्र आणतो. अगदी हैदराबादसारख्या शहरातसुद्धा अशा प्रकारचे ‘वल्नरेबिलिटी सर्कल्स’ लोकांना भेटण्याची, आपले भाव मोकळे करण्याची आणि आसवं ढाळण्याची संधी देत आहेत.

क्रायिंग क्लबमध्ये काय घडतं?

मुंबईतील खार भागातील नव्या ‘क्राय क्लब’मध्ये सहभागींसाठी एक सुरक्षित आणि कोणताही निर्णय न देणारं वातावरण तयार केलं जातं. सौम्य संगीत, गरमागरम चहा आणि शांत वातावरणात लोक एकत्र येतात. रुमाल आणि टिश्यूज असतातच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिथे असतात समजून घेणारे, पाठिंबा देणारे अनोळखी लोक असतात.

याठिकाणी तुम्हाला तुमच्या भावना समजावून सांगायची किंवा त्यांचं कारण द्यायची जबरदस्ती नसते. फक्त मनातलं व्यक्त करायचं मग ते रडून असो, मन मोकळं करून बोलून असो किंवा अगदी एखाद्याला मिठी मारून असो. लोक इथून निघताना थोडं हलकं झालेलं जाणवतात.

रुइकात्सू- जपानकडून आलेली गोष्ट

‘रुइकात्सू’ हा जपानी शब्द दोन शब्दांतून बनला आहे. ‘रुइ’ म्हणजे अश्रू आणि ‘कात्सू’ म्हणजे क्रियाकलाप. जपानमध्ये आधीच अशा प्रकारच्या जीवनशैलीला नावं दिली जातात, जसं की ‘शुकात्सू’ (नोकरी शोधणं) किंवा ‘कोंकात्सू’ (लग्नाची तयारी).

२०१३ मध्ये जपानी उद्योजक हिरोकी तेराई यांनी हे संकल्पनात्मक पातळीवर आणलं. त्यांनी पाहिलं की, लोक रडल्यानंतर अधिक हलकं, शांत आणि आनंदी वाटतात. त्यातून त्यांनी खास सेशन्स सुरू केले जिथे लोक एकत्र येऊन भावनिक चित्रपट बघतात, हृदयस्पर्शी गोष्टी ऐकतात किंवा अशा पत्रांचं वाचन करतात जे त्यांना रडायला लावतील. काही ठिकाणी ‘टिअर थेरपिस्ट्स’ म्हणजेच मार्गदर्शक असतात जे लोकांना साठून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यात मदत करतात.

क्राय क्लब्स का उपयोगी ठरतात?

शास्त्राने हे सिद्ध केलं आहे की, भावनिक अश्रूंमध्ये ताण निर्माण करणारे हार्मोन्स असतात आणि रडताना ते शरीरातून बाहेर पडतात. त्यामुळे रडणं हे दुर्बलतेचं नव्हे तर प्रामाणिकपणाचं लक्षण मानलं जातं. अश्रूंमधून आपण आपल्या आयुष्यातल्या खोल सत्यांपर्यंत पोहोचतो. दडपलेलं दुःख, अपयशांची वेदना किंवा अपूर्ण राहिलेलं प्रेम. म्हणूनच रडणं ही एक प्रकारची नैसर्गिक थेरपी ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT