Excessive Thirst Causes saam tv
लाईफस्टाईल

Excessive Thirst Causes : पाणी पिऊनही वारंवर तहान लागतेय? 'या' आजारांचं असू शकतं लक्षणं, वेळीच डॉक्टरांकडे जा!

Excessive Thirst Causes : जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे.

Surabhi Jagdish

जास्त प्रमाणात चाललो किंवा थकल्यानंतर तुम्हाला तहान लागते. पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं. मात्र पाणी पिऊन काहींची तहान भागत नाही. जर तुमच्या बातीतही असं घडत असेल तर तुम्ही सावध व्हा. कारण हे गंभीर समस्यांचं कारण असू शकतं.

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तहान लागणं ही सामान्य गोष्ट आहे. मात्र जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर तुमच्या शरीरात काहीतरी गडबड असण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया सतत तहान लागत असल्यास कोणत्या समस्यांचा धोका असतो.

का लागते वारंवार तहान?

पॉलीडिप्सिया

पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. मात्र यावेळी जर तुम्हाला जर तुम्हाला वारंवार तहान लागत असेल तर ती पॉलीडिप्सियाची स्थिती असू शकते. या परिस्थितीत अनेक दिवस, आठवडे किंवा महिने तहान खूप जास्त राहू शकते. यामध्ये पाणी पिऊनही तहान भागत नाही.

डायबिटीज इन्सिपिडस

डायबिटीज इन्सिपिडसच्या समस्येमध्ये वारंवार तहान लागू शकते. यामध्ये व्यक्तीला पाणी पिऊनही तहान लागते. या आजारात किडनी आणि त्याच्याशी संबंधित ग्रंथींबरोबरच हार्मोन्सवरही परिणाम होताना दिसतो. यामुळे लघवीचं प्रमाण वाढून वारंवार तहान लागते.

हायपोक्लेमिया

जेव्हा रक्तातील पोटॅशियमचं प्रमाण सामान्यपेक्षा कमी होतं त्यावेळी हायपोक्लेमियाची स्थिती उद्भवू शकते. यामध्ये रुग्णांना सतत तहान लागू शकते. उलट्या, अतिसार, काही औषधे घेतल्याने पोटॅशियमच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास जास्त तहान लागू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackray : 'महायुतीचा नोट जिहाद'; विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

Rohit Pawar : महायुतीकडे खूप पैसा, तो हेलिकॉप्टरनेही पोहचवतील; विनोद तावडे प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Kantara 2 Teaser: 'कांतारा २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

Assembly Election: बोटाला शाई लावून 1500 रुपयांचं वाटप; छत्रपती संभाजीनगरमधील व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Updates: भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना पैसे वाटावे लागणे दुर्दैवी : अंबादास दानवे

SCROLL FOR NEXT