Vertigo saam tv
लाईफस्टाईल

Vertigo: सभोवतालचं जग फिरतंय असं वाटतंय? जाणून घ्या व्हर्टिगो चक्कर म्हणजे नेमके काय?

Surabhi Kocharekar

अनेकदा आपल्याला चालताना किंवा सकाळी उठल्यानंतर चक्कर आल्यासारखं वाटू लागतं. हे सामान्य गरगरण्यासारखं भासत नाही. कदाचित तुम्हालाही असा त्रास जाणवला असेल, याला व्हर्टिगो असं म्हटलं जातं. आपल्यापैकी अनेकजण अशी आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये याचा त्रास जाणवतो. पण नेमकी ही व्हर्टिगोची समस्या काय आहे, हे जाणून घेऊया.

व्हर्टिगो म्हणजे नेमकं काय?

व्हर्टिगो ही एक अशी स्थिती आहे, जी शरीराच्या तोल साधण्याच्या जाणीवेवर परिणाम करते. ही समस्येचा त्रास कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. आजच्या घडीला अनेकांना ही समस्या असून तिच्याविषयीच्या जागरुकतेचं प्रमाण मात्र अजूनही मर्यादित आहे.

व्हर्टिगोच्या समस्येचं प्रमाण किती?

जागतिक स्तरावर प्रत्येक दर १० पैकी एका व्यक्तीला आयुष्याच्या कोणत्या-ना-कोणत्या टप्प्यावर व्हर्टिगोचा त्रास होतो. देशभरात जवळ-जवळ ७ कोटी लोकांना ही समस्या आहे. अबॉटने आयक्‍यूव्‍हीआयएच्या सहयोगाने केलेल्या एका सर्व्हेक्षणात असं दिसून आलंय की, भारतातील कित्येक जण तर वर्षभराहून अधिक काळ या व्हर्टिगोबरोबर जगतायत. यावेळी या लोकांना महिन्यातून एक-दोनदा त्याचा झटका अनुभवत असल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान हा त्रास वारंवार जाणवत असूनही अनेक व्यक्ती आपल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा अगदीच नाइलाज झाल्याखेरीज वैद्यकीय मदत घ्यायला टाळाटाळ करत राहतात.

अबॉट इंडियाच्या मेडिकल डिरेक्टर डॉ. जेजु करनकुमार सांगतात, “व्हर्टिगोविषयी जागरुकता निर्माण करणं ही लोकांना आवश्यक ते सहाय्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या माहिती व संसाधनांनिशी त्यांची मदत करण्याची गुरुकिल्ली आहे. अबॉट आणि आयक्‍यूव्‍हीआयएच्या सर्वेक्षणानुसार व्हर्टिगोच्या रुग्णांना गरगरण्याच्या भावनेच्या जोडीला जाणवणाऱ्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी (५४ टक्‍के), डोके जड होणं (४१ टक्‍के), आणि मान दुखणे (२८ टक्‍के) या गोष्टींचा समावेश असतो. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अडथळे येतात, ज्यामुळे त्यांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाणे रद्द करावे लागते, त्यांना गैरहजर रहावे लागते आणि कुटुंबाबरोबरही नेहमीपेक्षा कमी वेळ घालवता येतो.

डॉ. करनकुमार पुढे म्हणाले की, लवकर निदान करून घेण्यास प्रोत्साहन दिल्याने आणि योग्य उपचारांचा आधार मिळाल्याने व्हर्टिगोचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते आणि रुग्णांना एक संतुलित व आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते.”

व्हर्टिगोमुळे येणारी चक्कर नीट समजून घ्या

गरगरणे म्हणजे काही क्षणांसाठी डोकं हलके झाल्यासारखं वाटणे, अस्थिर वाटणं, तोल जाणं, अशक्त वाटणं होय. पण व्हर्टिगो असलेल्या व्यक्तीला या सर्व लक्षणांच्या जोडीने आपला भोवताल फिरत असल्यासारखे व त्यामुळे आपला तोल जात असल्यासारखं वाटू लागतं. अनेक जण ही रक्तातली साखर वाढल्याची, ब्लड प्रेशर कमी झाल्याची, डिहायड्रेशनची किंवा ताणतणावाची लक्षणं असल्याचं गृहित धरून व्हर्टिगोकडे दुर्लक्ष करतात.

व्हर्टिगो असलेल्या व्यक्तींपैकी ४४ टक्‍के व्यक्तींना आठवड्यातून किमान एकदा तरी हा गरगरण्याचा अनुभव येतो, असं अबॉट आणि आयक्‍यूव्‍हीआयएच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. व्हर्टिगोमध्ये अशी चक्कर येण्याची किंवा गरगरण्याची तीव्रता कमी-जास्त असू शकते. या समस्येची लवकरात लवकर तपासणी झाल्यास लवकरात लवकर निदान होते व उपचार सुरू होतात, ज्यामुळे भविष्यातील गुंतागूंत टाळता येतात.

सायन हॉस्पिटल, मुंबईच्या एचओडी व कन्सल्टन्ट ईएनटी अँड स्कल बेस सर्जन डॉ. रेणुका ब्राडू यांच्या मते, “व्हर्टिगो हा आजार भारतात अधिकाधिक सामान्य होतोय. अनेक व्यक्तींना त्याची लक्षणं ओळखू येत नाहीत, ज्यामुळे निदान व उपचारांना विलंब होऊ शकतो. अनेक व्यक्ती व्हर्टिगो, चक्कर आल्याची भावना व अस्थिर वाटणं व उलटीच्या भावनेसारख्या लक्षणांना कसं ओळखावे याबद्दल अनभिज्ञ असतात. डोके गरगरल्याने येणारी चक्कर आणि व्हर्टिगोमुळे येणारी चक्कर यातील फरक ओळखण्याविषयी जागरुकता निर्माण झाल्यास योग्य निदान व उपचार मिळण्यास मदत होऊ शकेल.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbagcha Raja: 'लालबागचा राजा'च्या हुंडीत लाखो रुपयाचे दागिने; अर्पण झालेल्या सोन्या-चांदीचा लिलाव सुरू

Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी झाला बाप; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो

Panhala Fort Spot : महाराजांचं शौर्याची साक्ष असलेला पन्हाळा; पर्यटकांना करतो आकर्षित

Wadigodri Fight Video : वडीगोद्रीतील वादाचा नवा व्हिडिओ आला समोर; पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला

Imtiaz Jalil: नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेले पिल्लू; माजी खासदार जलील यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT