Chikungunya New Varient: पालकांनो काळजी घ्या! मुलांना अधिक धोका, चिकुनगुनियाचा नवा व्हेरिएंट; लक्षणं काय? काळजी काय घ्याल?
पावसाळ्याचे दिवस अजून पूर्णपणे गेलेले नाही. अजूनही काही ठिकाणी पावसाचं प्रमाण पाहायला मिळतंय. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशातच आता चिकुनगुनियाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये देखील हा व्हेरिएंट दिसून येतोय.
सध्याच्या काळात हवामानातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. डास चावल्यामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होतेय. अशातच आता चिकुनगुनियाचा एरा नवा व्हेरिएंट आला असून यामुळे रूग्णामध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक वाढते.
चिकुनगुनियाचा नवा व्हेरिएंट
बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांच्या सांगण्यांनुसार, सध्या मुंबई तसंच पुणे या ठिकाणी चिकुनगुनियाच्या रूग्णांमध्ये वाढ झालीये. यामध्ये लहान मुलांना देखील याची लागण होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुळात सध्या चिकुनगुनियाचा एक नवा व्हेरिएंट आला आहे, असं आपण म्हणून शकतो. या व्हेरिएंटमुळे अधिक गुंतागुंत होण्याचा धोका असू शकतो.
नव्या व्हेरिएंटमध्ये काय दिसून येतात लक्षणं?
चिकुनगुनियाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे रूग्णाला अधिक गुंतागुंत होण्याचा धोका असतो. यामुळे पॅरालिसिस, मेंदूच्या नसा ब्लॉक होणं, चेहऱ्याचा काही भाग काळा पडणं इतर अशा समस्या दिसून येऊ शकतात. मुळात चिकुनगुनियाच्या या व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर रूग्ण बरा होण्यास देखील बऱ्याच प्रमाणात वेळ लागू शकतो. यापूर्वी ही समस्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी बरा होत होता. मात्र आता या नव्या व्हेरिएंटमुळे रूग्ण बरा होण्यास २०-२५ दिवसांचा कालावधी लागतो, असंही डॉ. अन्नदाते यांनी सांगितलं आहे.
कसा पसरतो चिकुनगुनियाचा व्हायरस?
चिकुनगुनियाचा व्हायरस हा डासांमुळे पसरत असून एडिस (स्टेगोमिया) इजिप्टी आणि एडिस (स्टेगोमिया) अल्बोपिक्टस यांच्यामुळे डेंग्यू पसरतो. हे डास प्रामुख्याने दिवसा प्रकाशात चावतात. हे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. जेव्हा सामान्य डास एखाद्या व्यक्तीला चावतो ज्याच्या रक्तात आधीपासूनच CHIKV आहे, तेव्हा हा व्हायरस डासांमध्ये पसरतो आणि हा डास नवीन व्यक्तीला चावतो. त्यावेळी देखील त्या व्यक्तीलाही चिकुनगुनियाची लागण होऊ शकते.
काय आहेत याची लक्षणं?
अचानक ताप येणं
जॉईंट्समध्ये प्रचंड वेदना होणं
इसके साथ ही जोड़ों में तेज दर्द हो सकता है।
डोकेदुखी
मसल पेन
थकवा
मळमळ
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.