FD News : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकने (SSFB) मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. बँकेने २ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदर एक ते पाच वर्षांपर्यंत ४९ ते १६० बेस पॉइंट्सने (BPS) वाढवले आहेत. बँकेने म्हटले आहे की, नवीन व्याजदर ५ मे पासून लागू झाले आहेत. बँक एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज मिळेल.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ९९९ दिवस आणि पाच वर्षांत मुदत ठेवींवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. व्याजदरातील बदलानंतर बँक सर्वसामान्यांना एफडीवर ४.०० टक्के ते ९.१० टक्के व्याज देत आहे. बँक ७ वर्षे ते १० वर्षांच्या कालावधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४.५० टक्के ते ९.६० टक्के व्याज देत आहे. (Latest Marathi News)
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने यापूर्वी मार्च २०२३ मध्ये त्यांचे एफडी व्याजदर बदलले होते. त्यानंतर बँकेने ५ ते १० वर्षांच्या एफडीसाठी व्याजदर ७५ ते १२५ बेसिस पॉइंट्सने वाढवले होते. याशिवाय बँकेने बचत खात्यावरील व्याजात २०० बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. SSFB आपल्या बचत खाते ग्राहकांना ५ लाख ते २ कोटी रुपयांच्या स्लॅबमध्ये ७.०० टक्के दराने व्याज देत आहे.
SSFB व्यतिरिक्त, युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी १,००१ दिवसांच्या एफडीवर ९.५० टक्के व्याजदर देत आहे. तर इतरांसाठी बँक त्याच कालावधीच्या एफडीवर ९ टक्के दराने व्याज देत आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ७०० दिवसांच्या एफडीवर एफडीवर ९ टक्के व्याजदर देखील देत आहे.तर इतरांसाठी त्याच कालावधीच्या ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.