NRE FD Rates 2023: एनआरई (NRE) खात्याच्या मुदत ठेवींसाठी नवीन दर लागू झाले आहेत. एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक आणि पीएनबी यांनी त्यांच्या खातेदारांना नवीन व्याजदरांचा लाभ देण्यास सुरुवात केली आहे.
काय असतं एनआरई खातं? (WHAT IS NRE ACCOUNT)
परदेशात राहणाऱ्या भारतीयांची बँक खातीही भारतात उघडली जातात. हे लोक भारतातील त्यांच्या बँक खात्यांमध्ये परकीय चलन जमा करतात. या लोकांच्या बँक खात्यांना अनिवासी बाह्य खाती म्हणतात. या खात्यांमधून भारतीय चलन रुपयाच्या रूपात रक्कम काढली जाते. हे खाते वैयक्तिक आणि संयुक्तपणे उघडता येते. (Latest Marathi News)
एनआरई एफडी दर
अनिवासी बाह्य खात्यामध्ये (Non-Resident External Account) बचत खाते, चालू खाते आणि मुदत ठेव खाते यांचा समावेश होतो. एनआरई खात्याचा व्याजदर प्रत्येक बँक नुसार बदलतो.
यातच सरकारी ते खाजगी बँकांपर्यंतच्या एनआरई खात्यांच्या मुदत ठेव व्याजदरांचे तपशील खालीलप्रमाणे आहे.
एसबीआय बँक
एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दोन कोटींपेक्षा कमी रकमेवर ६.५० टक्के ते ७.१० टक्के व्याज दिले जाते. तसेच एसबीआय दोन कोटींहून अधिक रकमेवर 6.00 टक्के ते ६.७५ टक्के व्याज देत आहे. बँकेने १५ फेब्रुवारी २०२३ पासून नवीन दर लागू केले आहेत.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेच्या वतीने एनआरई खातेधारकांना दोन कोटींपेक्षा कमी रकमेसाठी ६.६० टक्के ते ७.१० टक्के व्याज आणि दोन कोटींपेक्षा जास्त रकमेसाठी ७.१० टक्के ते ७.७५ टक्के व्याज दिले जात आहे. हे नवीन दर २१ फेब्रुवारी २०२३ पासून समाविष्ट करण्यात आले आहेत.
पीएनबी बँक
पंजाब नॅशनल बँकेने NRE FD दरात वाढ केली आहे. जेथे गेल्या वर्षी दर ५.६ टक्के ते ६.७५ टक्के होते. तर पीएनबीने या वर्षी हे दर ६.५ टक्क्यांवरून ७.२५ टक्के केले आहेत. पीएनबी १ जानेवारी २०२३ पासून हे दर लागू केले आहे.
आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँकेने एनआरई खात्यांसाठी मुदत ठेवींचे दर ६.७० टक्के ते ७.१० टक्क्यांच्या श्रेणीत ठेवले आहेत. हे दर २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू आहेत.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेने एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी ६.७० टक्के ते ७.२५ टक्के मुदत ठेवींसाठी व्याजदर निश्चित केला आहे. कॅनरा बँकेचे दर ५ एप्रिल २०२३ पासून लागू झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.