फॅटी लिव्हरचं प्रमाण देशात झपाट्याने वाढत आहे.
सरकारने सर्व राज्यांना तपासणीचे निर्देश दिले आहेत.
NAFLD आता MAFLD म्हणून ओळखला जातो.
देशात सध्या फॅटी लिवरसारख्या गंभीर आरोग्य समस्येचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. आहे. ही समस्या ओळखून वेळीच उपाययोजना व्हावी यासाठी केंद्र सरकारने आता पावलं उचलली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी संसदेत माहिती दिली की, सर्व राज्यांना नागरिकांची फॅटी लिवरसाठी तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पूर्वी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज (NAFLD) म्हणून ओळखली जाणारी ही स्थिती आता मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिवर डिसीज (MAFLD) या नावाने ओळखली जाते. लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होणं ही याची मुख्य लक्षणं आहेत. या आजाराचा थेट संबंध लठ्ठपणा, मधुमेह आणि जास्त कोलेस्ट्रॉल यांसारख्या मेटाबॉलिक समस्यांशी असतो.
आरोग्यमंत्री नड्डा यांनी सांगितले की, सरकारने फॅटी लिव्हरविषयी जनजागृती करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक तत्त्वं तयार करून दिल्या आहेत. या गाइडलाइन्समधून लोकांना योग्य आहार, नियमित व्यायाम, वजनाचं नियंत्रण आणि साखर-फॅट यांचं प्रमाण मर्यादित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. डॉक्टरांनी तपासणी करताना या मार्गदर्शक सूचनांनुसारच काम करावं आणि गरज असल्यास रुग्णाला योग्य उपचार मिळवून द्यावा, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
नड्डा यांनी संसदेत दोन महत्त्वाचे अभ्यास सादर केले. यामध्ये पहिला अभ्यास 2025 मध्ये ‘नेचर सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला. या अभ्यासात हैदराबादमधील 345 आयटी कर्मचार्यांचा समावेश होता. त्यामध्ये 34% कर्मचार्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम असून तब्बल 84% कर्मचार्यांच्या लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट्स सापडले. यावरून आयटी सेक्टरमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते.
दुसरा अभ्यास इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला. राजस्थानमधील ग्रामीण भागात लिव्हरच्या आजारांबरोबरच मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका किती आहे याचा अभ्यास करण्यात आला. यात 37% लोकांमध्ये फॅटी लिवरची लक्षणं दिसली. विशेष म्हणजे, ही समस्या पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात होती. जे लोक आठवड्यातून एकदा जरी फास्ट फूड खात होते, त्यांच्यात ही समस्या अधिक आढळली.
सरकारने आयुष्मान आरोग्य मंदिर योजनाअंतर्गत मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचे प्राथमिक टप्प्यावरच निदान आणि उपचार करण्यासाठी सुविधा दिल्या आहेत. याशिवाय वेळोवेळी जनजागृती मोहिमा राबवण्यात येतात.
एफएसएसएआय (FSSAI) ही संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून लिव्हरशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवते. याशिवाय फिट इंडिया मूव्हमेंट आणि योगासंबंधी उपक्रम क्रीडा मंत्रालय आणि आयुष मंत्रालय सातत्याने राबवत आहेत, जेणेकरून लोकांचा आरोग्यदृष्टिकोन सुधारेल.
फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि त्याचे नवीन नाम काय आहे?
फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे. आता त्याला मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज (MAFLD) म्हणून संबोधले जाते.
सरकारने फॅटी लिव्हरविरुद्ध कोणती पावले उचलली आहेत?
सरकारने सर्व राज्यांना नागरिकांची फॅटी लिव्हरसाठी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
हैदराबादमधील अभ्यासात काय धक्कादायक निष्कर्ष समोर आले?
हैदराबादमधील 345 आयटी कर्मचाऱ्यांपैकी 84% लोकांच्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी आढळली, ज्यामध्ये 34% लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम होता.
राजस्थानमधील ग्रामीण भागातील अभ्यासात काय समोर आले?
राजस्थानमधील ग्रामीण भागात 37% लोकांमध्ये फॅटी लिव्हरची लक्षणे आढळली, विशेषतः फास्ट फूड खाणाऱ्यांमध्ये आणि पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात.
फॅटी लिव्हरच्या गंभीर परिणामांपासून कसे बचाव करता येईल?
नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि वेळोवेळी लिव्हरची तपासणी करून फॅटी लिव्हरच्या गंभीर परिणामांपासून बचाव करता येतो.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि वेळोवेळी लिव्हरची तपासणी करून फॅटी लिव्हरच्या गंभीर परिणामांपासून बचाव करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.