Father Child Relationship
Father Child Relationship Saam tv
लाईफस्टाईल

Father-Child Relation: उतार वयात कसे जपावे आपल्या वयस्कर वडिलांचे मन!

कोमल दामुद्रे

Father-Child Relationship : असं म्हणतात आई-मूलाच नातं अगदी मूल जन्माला येण्याआधीपासूनच असतं. अर्थात आई नऊ महिने मूलाला आपल्या उदरात वाढवते. त्यामूळे नेहमी आईची ही हळवी बाजूच आपल्याला दिसते. पण वडिलांच्या कठोर स्वभावामागे दडलेली माया मूलांच्या लक्षात येणारी नसते.

जसं आई (Mother) झाल्याशिवाय आईपण कळत नाही तसेच बाप झाल्याशिवाय वडिलांची जबाबदारी आणि काळजी कळत नाही. आपले वडिल फक्त आपलेच नाही तर संपूर्ण कुटुंबाचे वडिल असतात तेव्हा आपल्या कुटुंबाच्या (Family) गरजा पूर्ण करण्यात, त्यांना सुरक्षित आणि चांगले आयुष्य देण्यात ते आपले संपूर्ण आयुष्य घालवतात.

त्यामुळे ज्या मुलांसाठी मी आयुष्यभर मेहेनत केली त्याने माझा उतार वयात सांभाळ करावा एवढीच त्यांची अपेक्षा असते. परंतु लहानपणीची कठोर वागणूक, विचारांतील मतभेद यामुळे मुल आपल्या वडिलांना ओझं मानू लागतात. ही गोष्ट मात्र वडिलांच्या डोक्यात घर करु शकते आणि नात्यामध्ये (Relationship) दुरावा येऊ शकतो. तेव्हा आपल्या उतार वयातील वडिलांशी वागताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या हे पाहूयात.

या गोष्टी बोलणे टाळा.

1. "तुम्हाला काही कळत नाही तुम्ही शांत बसा"

वडिल निवृत्त झाल्यावर घराची सगळी जवाबदारी मूलाच्या खांद्यावर येते. तेव्हा घरातील महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हक्कही अनेकदा मूल स्वतःकडे घेतात आणि वडिलांना " तुम्ही शांत बसा! तुम्हाला काही कळत नाही." हे वाक्य ऐकवून वडिलांचे मत डावलले जाते. परंतु अशा वागणूकीमुळे वडिलांना वाईट वाटू शकते.

2. "जे काम येत नाही ते करता कशाला"

मुल आणि पालक यांच्यातील जनरेशन गॅपमुळे अनेक गोष्टी बदलतात. ज्या आई-वडिलांनी एका काळी बोट धरून चालायला शिकवलं त्याच आई-वडिलांना त्यांच्या मुलांची गरज लागते. त्यामुळे अशावेळी त्यांना वेळ घेऊन प्रेमाने शिकवण्याऐवजी जर तुम्ही रागात किंवा मस्करीत "ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टी करता कशाला" असे जेव्हा बोलतो तेव्हा त्यांना अपमानीत वाटू शकते. तेव्हा जमेल तेवढ्या संयमाने आणि प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा.

3. "तुम्ही मुलांना बिघडवून ठेवलंय"

निवृत्तीनंतर म्हातारे माणूस आपला जास्तीत जास्त वेळ नातवंडांच्या सहवासात घालवते. बघायला गेलं तर म्हातारपण हे दुसरं बालपण असते. तेव्हा ते याकाळात आपलं बालपण पुन्हा जगत असतात. अशात अनेकदा मुले बेशिस्त वागली की, त्यांना दोष दिला जातो. याचा देखील त्यांना त्रास होऊ शकतो.

4 ."तुम्ही आमच्यासाठी काय केलंय?"

जेव्हा मुल आयुष्यात काही साध्य करत नाहीत तेव्हा ते या कारणासाठी आपल्या वडिलांना दोष देतात. या गोष्टी कधी मस्करीत तर कधी रागात बोलल्या जातात. त्यावेळी मुलांना या गोष्टीचा अंदाज येत नाही की, त्यांनी कित्येक गोष्टींचा त्याग केला असेल, आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवले असेल. यामुळे आपले वडिल दुखावले जाऊ शकतात.

5."हे सर्व तरुणांना शोभतं"

अनेकदा मुल आपल्या वडिलांच्या वैयक्तिक आवडींना स्विकारत नाहीत. उदाहरणार्थ त्यांचे रहाणीमान, त्यांच्या आवडी-निवडी. "हे सर्व तरुणांना शोभतं" असं बोलून त्यांना त्यांच्या वृध्दत्त्वाची जाणीव करून देणे त्यांना दुखावू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video: Taarak mehta ka ooltah chashmah मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत बेपत्ता झाल्यानं खळबळ!

Taiwan Earthquake News : ६.१ तीव्रतेच्या भूकंपाने तैवान पुन्हा हादरलं; नागरिकांमध्ये घबराट

Tharla Tar Mag: सायली अर्जुन खरे नवरा- बायको नाहीत...; चैतन्यने सांगितलं साक्षीला सत्य

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत नवा ट्वीस्ट! महंत अनिकेत शास्त्रीही निवडणुकीच्या रिंगणात; भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचा दावा

Sambhajinagar News : अंबड टाकळी परिसरात सिलिंडरचा स्फोट, घर संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT