Navratri Fasting Benefits saam tv
लाईफस्टाईल

Navratri Fasting Benefits : नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करताय? उपवासाचे 'हे' फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित!

Navratri Fasting Benefits : पितृपक्ष समाप्त झाला असून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. मात्र या नवरात्रीमध्ये उपवास करताना आरोग्य देखील कसं जपता येईल हे पाहिलं पाहिजे.

Surabhi Jayashree Jagdish

पितृपक्ष समाप्त झाला असून नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आपल्या देशभरात संपूर्ण उत्साहाने नवरात्री सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी या नवरात्रीची सांगता होते. या नऊ दिवसादरम्‍यान भक्‍त देवीची आराधना करतात आणि दिवसभर उपवास देखील करतात. मात्र या नवरात्रीमध्ये उपवास करताना आरोग्य देखील कसं जपता येईल हे पाहिलं पाहिजे.

फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील न्‍यूट्रिशन अँड डायटेटिक्‍स विभागप्रमुख राजेश्‍वरी व्‍ही शेट्टी यांनी सांगितलं की, उपवासाच्‍या कालावधीदरम्‍यान धान्‍य किंवा डाळींपासून बनवलेले खाद्यपदार्थ सेवन करत नाहीत, तसंच मांसाहारी खाद्यपदार्थ देखील सेवन करत नाहीत. परिणामी शरीरातील व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍ससह आवश्‍यक पौष्टिक घटक कमी होण्‍याची शक्‍यता वाढते. नवरात्री जल्‍लोषात सण साजरा करण्‍यासोबत उपवास करण्‍याचे आणि हेल्दी राहण्याचे काय मार्ग आहेत ते पाहूयात.

उपवासाचे काही आरोग्‍यदायी फायदे

चयापचय क्रिया उत्तम राहते

उपवासादरम्‍यान खाण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारण्‍यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती उत्तम होण्‍यास आणि ऊर्जा पातळी वाढण्‍यास मदत होते.

हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहते

नवरात्रीदरम्‍यान केला जाणाऱ्या उपवासादरम्‍यान उपवासाचे पदार्थ सेवन केले जातात. यामुळे हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहू शकतं. याशिवाय उच्‍च कोलेस्‍ट्रॉलची पातळी देखील चांगली राहते.

डिटॉक्सिफिकेशनमध्‍ये मदत

नवरात्रीदरम्‍यान खाल्ल्या जाणाऱ्या उपवासाच्‍या पदार्थांमध्ये ताजी फळं आणि भाज्‍यांचा समावेश करा. यामुळे शरीराचे डिटॉक्सिफाय होण्‍यास आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.

या काळात अधिक तळलेल्‍या स्‍नॅक्‍ससह पॅकेटमधील सॉल्‍टेड स्‍नॅक्‍सचं सेवन टाळलं पाहिजे. कारण मीठाचे अधिक प्रमाण व घातक फॅट्समुळे ते अनारोग्‍यकारक आहेत. त्‍याऐवजी, बदाम, मनुका व अक्रोड यांसारखे पौष्टिक नट्सचे सेवन करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT