Beauty Tips : महिला या सुंदर दिसण्यासाठी अनेक उपाय करत असतात. चेहऱ्यावरील सौंदर्य खुलण्यासाठी अनेक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. तर अनेक महिला चेहऱ्यावरील केसांमुळे तणावात असतात. चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी महिला हेअर रिमूव्हल क्रीम, ब्लिच, वॅक्सिंगचा तर काही जणी थ्रेडिंगचा वापर करतात यामुळे कायमस्वरूपी नाही पण काही दिवस चेहऱ्यावर केस दिसत नाही.
1) चेहऱ्यावर शरीरातील हार्मोनल बदलामुळे केस येतात. तसेच खाण्या-पिण्याच्या बदलामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. घरातील काही उपायांनी हे केस सहज काढता येतील.
2) स्पिअरमिंट हा एक प्रकारचा पुदिना आहे ज्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील केस काढता येतात.
3) दालचिनीचा तुकडा घातलेले पाणी उकळून प्यायल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवता येतात.
4) पाण्यात मध, दालचिनी आणि जायफळ घालून उकळवा आणि प्या ज्यामुळे चेहऱ्यावरील केस निघतील.
5) अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ थांबते.यामुळे भिजवलेले अक्रोड खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते.
6) साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा १५ मिनिटांनी चेहरा धुवा.
7) दूध आणि हळद ही पेस्ट लावल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस नाहीसे होतात. चेहरा स्वच्छ व चमकू लागतो.