Sleeping With Bra Cancer Risk saam tv
लाईफस्टाईल

Sleeping With Bra Cancer Risk: ब्रा घालून झोपल्याने खरंच ब्रेस्ट कॅन्सर होतो का? व्हायरल पोस्ट मागचं सत्य काय?

Does Wearing A Bra At Night Cause Breast Cancer: रात्री ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो का? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दाव्याचं सत्य जाणून घ्या. तज्ज्ञांच्या मते, ब्रा आणि कॅन्सर यांचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर विविध प्रकारचे दावे केले जातात. सध्या असाच एका दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय. यामध्ये फिटनेस कोच आणि इन्फ्लुएन्सर प्रियांक मेहता यांनी एका व्हिडिओमध्ये दावा केला आहे, रात्री ब्रा घातल्याने स्तनाच्या कॅन्सरच्या धोका वाढू शकतो.

या व्हिडिओमध्ये, ते महिलांना कोणताही धोका टाळण्यासाठी रात्री ब्रा न घालण्याचा सल्ला देतात. दरम्यान डॉक्टरांनी केलेल्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे ते पाहूयात.

सोशल मीडियावर काय दावा करण्यात आलाय?

या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट करतो की, आपलं शरीर रात्री साचलेले टॉक्सिन घटक बाहेर टाकण्याचं काम करतं. काखेत, स्तनांच्या आणि छातीच्या आसपास असलेले लिम्फ नोड्स शरीर स्वच्छ करतात. तो पुढे म्हणतो की, जर एखादी स्त्री खूप घट्ट किंवा वायर असलेली ब्रा घालून झोपत असेल तर या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे सूज, शरीरात पाणी साठणं आणि कालांतराने स्तनांच्या ऊतींचं नुकसान होऊ शकतं.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

जरी हा दावा गंभीर असला तरी मेडिकल सायन्सला तो तो खरा वाटत नाही. हा सिद्धांत सर्वप्रथम १९९५ मध्ये समोर आला होता. जेव्हा सिडनी रॉस सिंगर आणि सोमा ग्रिस्मायर यांनी त्यांच्या 'ड्रेस्ड टू किल' या पुस्तकात ब्रा आणि ब्रेस्ट कॅन्सर यांच्यात संबंध असल्याचं म्हटलं होतं. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात केलेले दावे तज्ज्ञांनी मात्र फेळाटून लावले होते.

अमेरिका कॅन्सर सोसायटीचा रिपोर्ट

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, ब्रा घातल्याने लिम्फच्या प्रवाहात अडथळा येतो किंवा कॅन्सर होतो हे सुचवणारा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. त्याचप्रमाणे यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थने स्पष्टपणे म्हटलंय की, ब्रा घालणं किंवा ब्रेस्ट इम्प्लांट्स यांचा ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याशी कोणताही संबंध नाही.

ब्रिटन कॅन्सर रिसर्चचा दावा

युके कॅन्सर रिसर्च फाउंडेशनचं असंही म्हणणं आहे की, या विषयावर फारसं संशोधन करण्यात आलेलं नाही. कारण ब्रा आणि कॅन्सर यांच्यात संबंध असल्याचं दर्शवणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. त्याचप्रमाणे उपलब्ध अभ्यासांमध्येही असा कोणताही संबंध आढळलेला नाही.

2014 मध्ये 1500 हून अधिक महिलांवर केलेल्या एका मोठ्या अभ्यासात असंही आढळून आलंय की, ब्रा घालण्याच्या सवयी ती किती वेळ घातली जाते, त्यात वायरचा वापर किंवा कोणत्या वयात ती घालण्यास सुरुवात केली यापैकी कशाचाही ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याशी संबंध नव्हता.

डॉक्टरांचं म्हणणं काय?

firstcheck_in च्या रिपोर्टनुसार, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शुएब झैदी यांनीही हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते, दिवसा किंवा रात्री ब्रा घातल्याने कॅन्सरचा धोका वाढत नाही. स्तनांमध्ये लिम्फ अनेक मार्गांनी वाहतात. त्यामुळे एका भागावर दाब आला तरी त्यामुळे कोणताही धोका उद्धवत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon Blast Case Verdict: मोठी बातमी: 2006 मालेगाव स्फोटातील चार आरोपींची निर्दोष सुटका

Who Is Anne Hathaway: ना दीपिका, ना ऐश्वर्या, ही आहे जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री!

Crime: गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला रॉकेल ओतून जिवंत जाळलं; प्रपोज करते म्हणत खुर्चीवर बसवलं, डोळ्यांवर पट्टी अन् हात-पाय बांधले नंतर...

Mango Lassi Recipe: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो लस्सी; ५ मिनिटात होईल तयार, रेसिपी वाचा

Rinku Rajguru: रिंकू राजगुरु कोणाला म्हणते रोमिओ? ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन केली पोलखोल

SCROLL FOR NEXT