Instagram Update Saam TV
लाईफस्टाईल

Fact Check : इन्स्टाग्राम बंद होणार, फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check : इन्स्टाग्राम बंद होणार, त्यामुळे फोटो-व्हिडिओ सेव्ह करा? अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय, जाणून घ्या.

Mayuresh Kadav

मुंबई : इन्स्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आताच सगळा डाटा सेव्ह करून ठेवा. कधीही इन्स्टाग्राम बंद होईल आणि तुमचा डाटा उडून जाईल. कारण, सोशल मीडियावर असा एक मेसेज व्हायरल होतोय की इन्टाग्राम बंद होणार आहे. लाखो, कोट्यवधी लोक इन्स्टाग्राम वापरतात. फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर केला जातो. एकवेळ जेवायला नसेल तरी चालेल. मात्र, इन्स्टाग्राम हवं अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

सर्वात मोठ्या संख्येनं पाहिला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम 10 सप्टेंबरपासून बंद होणार आहे. फेसबुकवर एका यूजरने व्हिडिओ शेअर करून इन्स्टाग्राम 10 सप्टेंबरला बंद होणार असून लवकरच महत्त्वाचा डाटा, फोटो सेव्ह करून ठेवा. हे आपल्या मित्रांना कळवा.

आम्ही याचा तपास करण्यासाठी गुगल ओपन सर्चवर सगळे कीवर्ड्स वापरले...त्यावेळी आम्हाला इन्स्टाग्राम बंद पडणार का याबाबत काय सत्य आढळून आलं ते पाहूयात.

इन्स्टाग्राम बंद होणार असल्याची अधिकृत माहिती नाही

एवढं मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तात्काळ बंद होत नाही

कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्याआधी घोषणा केली जाते

इन्स्टाग्राम बंद होणार ही अफवा

इन्स्टाग्राम ही सध्याची सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. करोडो लोक इन्स्टाग्राम वापरतात. रात्रंदिवस फोटो शेअर, लाईक्स करत असतात. त्यामुळे असे मेसेज व्हायरल करून युजर्सशी दिशाभूल केली जातेय. आमच्या पडताळणीत इन्स्टाग्राम बंद होणार हा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT