Beauty Skin Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : ऑफिसला जाण्याआधी चेहऱ्याला लावा 'हा' फेसपॅक; स्किन आणि मूड दोन्ही होतील फ्रेश

Ruchika Jadhav

Skincare Tips For Glowing Skin: ऑफिसला जाताना प्रवासात वाहनांचा धूर, ऑफिसचं टेन्शन याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो. स्किन काळी पडते, शिवाय स्ट्रेसमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येतात. चेहरा डल झाल्यावर आपलं मन सुद्धा नाराज राहतं. मूड फ्रेश राहत नाही. तसेच रोज उठून ऑफिसला जाण्याचा सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय शोधला आहे. याचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील चमक आणखी वाढवू शकता आणि सुंदर दिसू शकता.

रामबाण फेसपॅक

ऑफिसचा स्ट्रेस आणि प्रवासात चेहऱ्यावर उडणारी धूळ या सर्वांमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे येऊन चेहरा पूर्ण डल होतो. या सर्वांवरच हा फेसपॅक काम करणार आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे बेसन पीठ मिक्स केले जाणार आहे. शिवाय अन्य अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर यात केला जाणार आहे.

वाचा साहित्य

बेसन पीठ - २ चमचे

मक्याचे पीठ - १ चमचा

कच्च दूध - १/२ वाटी

दही - १ चमचा

ऑफिसला जाण्याआधी चेहऱ्यावर अप्लाय करा

सर्वात आधी एक मोठी वाटी घ्या. त्यामध्ये वरती सांगितलेलं सर्व साहित्य टाकून घ्या.

त्यानंतर तयार पॅक तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा आणि १० मिनिटे थांबा.

चेहऱ्यावरील फेसपॅक सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्याने तुमचा चेहऱ्याची चमक अगदी १० पटींनी जास्त वाढलेली दिसेल.

काही महिलांची मान सुद्धा काळी असते. त्यामुळे तुम्ही हे मिश्रण मानेवर सुद्धा अप्लाय करू शकता.

मक्याचे पीठ त्वचेसाठी गुणकारी

मक्याच्या पिठात अनेक जीवनसत्व आणि मिनरल्स असतात. त्यामुळे तुम्ही त्वचेवर हे पीठ लावल्याने स्किनसाठी आवश्यक असलेली सर्व पोषण तत्व तुम्हाला मिळतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या सुद्धा कमी होतात आणि आपल्याला फ्रेश फिल होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

Maharashtra News Live Updates: तुळजापूर बोगस मतदान नोंदणी अर्ज प्रकरणाला राजकीय वळण

SCROLL FOR NEXT