Eye Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Eye Care Tips : डोळ्यांनी धुसर दिसतंय? चष्म्याचा नंबरही वाढलाय? या टीप्स फॉलो करा

Eye Exercises : डोळ्यांनी धूसर दिसणे किंवा डोळ्यांच्या इतर आजारांचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

How to Remove Specs Permanently

बदलेल्या जीवनशैलीनुसार हल्ली भारतात ९० टक्के लोकांना चष्मा लागला आहे. डोळ्यांनी धूसर दिसणे किंवा डोळ्यांच्या इतर आजारांचा सामना करावा लागतो. डोळे खरेतर आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

डोळ्यांची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. डोळ्याची काळजी न घेतल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. कदाचित दृष्टीदेखील कमी होऊ शकते. त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात. त्यात सध्या चष्मा लागणे हे खूप कॉमन झाले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकांना लोकांना चष्मा लागलेला आहे. त्यात व्यवस्थित काळजी न घेतल्याने चष्म्याचा नंबरदेखील वाढतो, त्यामुळे डोळ्यांना प्रचंड त्रास होतो. तुमच्या डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा डोळे चांगल्या ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्या. जेणेकरुन त्रास होणार नाही.

1. आहार

आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. निरोगी आरोग्यासाठी चांगला आहार घेणे महत्त्वाचे आहे. डोळे चांगले राहण्यासाठी जेवणात व्हिटॅमिन A, फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन C चा समावेश करा. यामुळे दृष्टी चांगली होईल. त्याचसोबत जेवणात फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

2. पुरेशी झोप

चांगले जीवन जगण्यासाठी जेवणासोबत झोपदेखील महत्त्वाची आहे. निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप (Sleep) महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेतल्याने डोळ्यांना आराम मिळतो. त्यामुळे शारिरिक आणि मानसिक आरोग्यास मदत होते. त्याचबरोबत सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करत असल्याने डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

3. व्यायाम

व्यायाम (exercise) हे सृदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी (Health) खूप महत्त्वाचे आहे. रोज व्यायाम केल्याने शरीर मजबूत राहते. त्याचसोबत तुम्ही सतत लॅपटॉपसमोर बसल्यास डोळ्यांना त्रास होईल. डोळ्यांना आराम देण्यासाठी डोळ्याचे व्यायम करा. तासाभरात ५ मिनिटे डोळ्यांचा व्यायाम करा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT