Breast Cancer Saam Tv
लाईफस्टाईल

Breast Cancer: सतत स्तनाला खाज येतेय? ब्रेस्ट कॅन्सर तर नाही ना...; डॉक्टरांनी सांगितली महिलांनी कोणती काळजी घ्यावी!

Symptoms of Breast Cancer: स्तनात सतत खाज येणे ही सामान्य समस्या वाटू शकते, पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे स्तनाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे महिलांनी या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळापासून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. जर या समस्येची कारणं किंवा लक्षणं वेळेत समजली तर या समस्येवर मात करण्यास मदत होते. एका वेबसाईटला माहिती देताना गाझियाबादच्या मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट ब्रेस्ट अँड एंडोक्राइन सर्जरीच्या डॉ. फरहीन खान यांनी सांगितलं की, ब्रेस्ट कॅन्सर हा सहसा ब्रेस्टच्या गाठीपासून सुरू होतो. याची लक्षणं हळूहळू दिसून येतात.

ब्रेस्ट कॅन्सरची सर्व लक्षणं ही सुरूवातीला दिसून येत नाही. यामध्ये स्तनात खाज सुटणं हे देखील एक लक्षण मानलं जातं. परंतु काहीवेळा सुरुवातीला त्याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करण्यात येतं.

ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च फाउंडेशनच्या आकडेवारीवरून असं दिसून आलंय की, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. जगातील 185 देशांपैकी 157 देशांमध्ये महिलांमध्ये या कॅन्सरचं निदान झालंय. ब्रेस्ट कॅन्सरच्या दुर्लक्ष केल्याने उपचारांना उशीर होऊ शकतो. यामुळे हा आजार जीवघेणार ठरू शखतो.

डॉ. फरहीन यांच्या मते, स्तनांमध्ये खाज येणं सामान्य मानण्यात येतं. तर स्तनाची त्वचा आणि पेशी एकमेकांशी जोडलेल्या असतात आणि अशा परिस्थितीत, सतत खाज येत असेल तर ते सामान्य नाहीये. स्तनाचा संसर्ग किंवा ब्रेस्ट कॅन्सर असल्याचा धोका असतो. स्तनांमध्ये खाज येण्याची सर्व प्रकरणं कॅन्सरची असतात असं नाही. परंतु जर खाज बऱ्याच काळापासून असेल तर हे चिंता करण्यासारखं आहे.

कोणती काळजी घेतली पाहिजे?

डॉ. फरहीन यांच्या मते, जर तुम्हाला स्तनात कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आली तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे.

  • विशेषत: जर स्तनाला खाज सुटत असेल तर सावध व्हा. कारण कॅन्सरमुळे बऱ्याचदा एकाच स्तनात खाज सुटते.

  • स्तनाच्या आकारात किंवा आकारात कोणताही बदल झाल्यास ते नियमितपणे तपासणी करा.

  • खाज सुटणं किंवा स्तनाग्रातून स्राव येत असेल तर सावध व्हा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

SCROLL FOR NEXT