Liver Disease Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver problem symptoms: रात्री सतत पाठदुखी होतेय; लिव्हर खराब होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

Early signs of liver disease: लिव्हरच्या समस्यांची सुरुवातीची लक्षणं अनेकदा साधी वाटतात, पण ती गंभीर आजाराचा इशारा असू शकतात. पाठदुखी, कावीळ, खाज आणि लघवीतील बदल ओळखा आणि वेळेत उपचार करून आरोग्य सुरक्षित ठेवा.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात कोणतीही समस्या असली तरी शरीर त्याचे संकेत आपल्याला देत असतं. अशातच लिव्हरची कोणतीही समस्या असेल तर शरीर सुरुवातीला त्याचे संकेत देतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ही लक्षणं फार साधी वाटतात. मात्र ती मोठ्या समस्येकडे इशारा देत असतात. लिव्हरच्या समस्येची कोणती लक्षणं दिसतात ती आपण पाहूयात.

रात्री उजव्या बाजूला पाठदुखी होणं

जर तुम्हाला रात्रीच्या वेळेस उजव्या बाजूला पाठदुखी होत असेल तर त्याकडे मसल पेन समजून दुर्लक्ष करू नका. लिव्हर आपल्या उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली असतं. जेव्हा लिव्हर सुजतं तेव्हा त्याचा त्रास खांद्याच्या मागच्या भागातही जाणवू शकतो. झोपल्यावर लिव्हरवर दाब वाढतो आणि वेदना जास्त जाणवतात.

कावीळ

लिव्हर नीट काम करत नसेल तर त्याचं एक ठळक लक्षण म्हणजे कावीळ. या अवस्थेत शरीरात तयार होणारं बिलीरुबिन हा पिवळसर रंगद्रव्य योग्य प्रकारे प्रोसेस होत नाही. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. यासोबतच लघवी गडद रंगाची होणं आणि शौचाचा रंग फिकट होणं हीही लक्षणं दिसू शकतात.

त्वचेवर पुरळ नसतानाही खाज येणं

जर तुम्हाला कोणताही पुरळ किंवा ऍलर्जी नसताना सतत खाज येत असेल, तर ते लिव्हरच्या बिघाडामुळे असू शकतं. लिव्हर नीट काम करत नसल्यामुळे बाइल सॉल्ट्स रक्तात साचतात. रात्रीच्या वेळेस रूग्णाला खाज येण्याची समस्या जास्त जाणवते.

पोटाच्या उजव्या बाजूला सूज

पोटाच्या उजव्या वरच्या भागात जडपणा, सूज किंवा दुखणं जाणवत असेल तर ते लिव्हर सुजल्याचं लक्षण असू शकतं. लिव्हर शरीरातील टॉक्सिन घटक नीट बाहेर टाकू शकत नसेल तर त्यात द्रव साचू लागतो. त्यामुळे पोट भरल्यासारखं किंवा जड वाटतं.

लघवीचा रंग बदलणं

लिव्हरमध्ये समस्या असल्यास लघवी आणि शौचाच्या रंगामध्ये बदल होऊ शकतो. जर लघवी गडद तपकिरी दिसत असेल तर रक्तात बिलीरुबिनचं प्रमाण वाढल्याचे संकेत असतात. त्याचप्रमाणे शौचाचा रंग फिकट किंवा मातीसारखा दिसत असेल तर लिव्हर आणि आतड्यांमधील प्रवाहात अडथळा असल्याची शक्यता असते

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वसंत मोरे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Rahul Roy Dance Video: 'त्याला नशेचं औषध दिलं असेल...', 'आशिकी' फेम अभिनेत्यावर आली 'अशी' वेळ

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; ऐन लग्नसराईत २२ अन् २४ कॅरेटचे दर किती?

Bachchu Kadu : मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार; अधिकृत घोषणा

Pune Train : पुण्याहून नागपूरला जायचं टेन्शन संपलं, समर स्पेशल ट्रेन झाली सुरू; वाचा कुठे थांबणार?

SCROLL FOR NEXT