Thyroid disorder saam tv
लाईफस्टाईल

Thyroid disorder: सतत बेचैनी आणि हृदयाची धडधड वाढतेय? डॉक्टरांनी सांगितली थायरॉईडच्या कॅन्सरची धोकादायक लक्षणं

Anxiety and thyroid: थकवा, चिंता, वजनातील बदल आणि घशातील समस्या ही थायरॉईडची लक्षणं असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर तपासणी आणि योग्य निदान झाल्यास गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

थकवा, वजनातील बदल, हृदयाची धडधड वाढणं, अस्वस्थता आणि चिंता यांसारख्या थायरॉईड-संबंधित समस्या झपाट्याने वाढतायत. मानसिक आरोग्याच्या समस्यांची लक्षणं चिंतेच्या लक्षणांसारखीच असल्याने रुग्ण अनेकदा गोंधळून जातात आणि गंभीर आजारांना बळी पडतात. काही प्रकरणांमध्ये कॅन्सर देखील होऊ शकतो.

एम्सचे प्राध्यापक डॉ. आर. गोस्वामी यांच्या मते, चिंता आणि तणावाची लक्षणं अनेकदा शरीरातील हार्मोनच्या असंतुलनाशी संबंधित असू शकतात. त्यामुळे केवळ मानसिक कारणं आहेत असं समजून उपचारांमध्ये अनेकदा उशीर होऊ शकतो. मात्र अशा परिस्थितीत स्वतःहून औषधोपचार करणं धोकादायक ठरू शकतं.

डॉ.गोस्वामी यांच्या सांगण्यानुसा, अशा प्रकरणांमध्ये थायरॉईड तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्या चाचण्या करायच्या आहेत ते तुम्हाला डॉक्टरच सांगतील. यामध्ये थायरॉईड फंक्शन टेस्ट, अल्ट्रासाऊंड आणि आवश्यक असल्यास बायोप्सी यांचा समावेश आहे. यामुळे आजाराचे अचूक निदान करण्यास मदत होते.

डॉ. आर. गोस्वामी यांनी पुढे सांगितलं की, जर घसा खवखवणं, आवाजात बदल, गिळण्यास त्रास होणं किंवा सतत थकवा जाणवणं यांसारखी लक्षणं दीर्घकाळ टिकून राहिली तर त्वरित तपासणी करून घ्यावी.

लक्षणं

  • घशात सूज येणं

  • घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं

  • विनाकारण वजन कमी होणं किंवा वाढणं

  • सततची अस्वस्थता, बेचैनी किंवा चिंता

  • घोगरा आवाज

  • गिळण्यास त्रास

  • सतत थकवा

अपोलो अथेना महिला कॅन्सर केंद्रातील हेड आणि नेक कॅन्सर विभागाचे डॉ. अनिल डिक्रूझ यांनी सांगितलंय की, थायरॉईडमधील प्रत्येक बदल कॅन्सरचा नसतो. परंतु काही प्रकरणांमध्ये, थायरॉईड ग्रंथीमधील गाठ किंवा असामान्य वाढ हे थायरॉईड कॅन्सरची लक्षं असू शकतात.

डॉ. अनिल यांनी पुढे सांगितलं की, लवकर निदान झाल्यास गंभीर आजाराचा धोका कमी होऊ शकतो. थायरॉईड आणि मानसिक आरोग्याच्या लक्षणांकडे वेगवेगळे घटक म्हणून न पाहता एकत्रितपणे पाहिलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT