Heart disease risk factors: 99% हार्ट अटॅक येण्यामागे हे 4 घटक कारणीभूत; संशोधनातून स्पष्ट

Surabhi Jayashree Jagdish

हार्टच्या समस्या

जगभरातील मोठ्या संशोधनातून समोर आलंय की, हार्ट, स्ट्रोक आणि इतर गंभीर हृदयविकारांच्या 99 टक्के घटना चार सामान्य आरोग्य समस्यांशी संबंधित आहेत.

यामध्ये उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, जास्त रक्तातील साखर आणि तंबाखूचं सेवन या गोष्टींचा समावेश आहे.

Heart attack causes

लोकांच्या डेटाचा अभ्यास

या संशोधनात अमेरिका आणि दक्षिण कोरियातील 90 लाखांहून अधिक प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याची माहिती घेतली गेली. संशोधकांनी दीर्घकाळ निरीक्षण करून हार्टशी संबंधित जोखमींचा सखोल अभ्यास केला.

High blood pressure

तरुणींमध्ये वाढता धोका

साधारणपणे 60 वर्षांखालील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी मानला जातो.

मात्र या अभ्यासात अशा महिलांमधील 95 टक्क्यांहून अधिक हार्टच्या समस्यांच्या घटना या चार जोखीम घटकांशी जोडलेल्या आढळल्या.

Blood sugar levels

उच्च रक्तदाब

संशोधनानुसार उच्च रक्तदाब हा हृदयविकार आणि स्ट्रोकमागील सर्वात मोठा कारणीभूत घटक ठरला. ज्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरचा त्रास झाला, त्यापैकी 93 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांमध्ये उच्च रक्तदाब आढळला. डॉक्टरांच्या मते, रक्तदाब वेळेवर नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

Heart health study

संशोधकांनी दिला महत्त्वाचा इशारा

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे कार्डिओलॉजी प्राध्यापक डॉ. फिलिप ग्रीनलँड यांच्या मते, हृदयाच्या समस्यामुळे होण्यापूर्वी शरीरात एक किंवा अधिक धोकादायक आरोग्य घटक जवळपास नेहमीच उपस्थित असतात. म्हणून उपचार होऊ शकणाऱ्या कारणांवर लक्ष केंद्रित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

Global heart research

लवकर निदान करणं

या संशोधनामुळे नियमित आरोग्य तपासणी आणि सुरुवातीपासूनच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉलची वेळोवेळी तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर हृदयविकार टाळता येऊ शकतात.

Heart attack prevention

धोकादायक घटक

ग्रीनलँड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, काही आधीच्या अहवालांमध्ये जोखीम घटक नसतानाही हार्टच्या समस्या वाढत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र नव्या अभ्यासानुसार, पूर्वीच्या संशोधनांमध्ये काही निदानं चुकली असावीत किंवा काही धोक्याचे घटक दुर्लक्षित राहिले असावेत.

Stroke prevention

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा