Surabhi Jayashree Jagdish
सध्या तरुणांमध्येही हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतायत. सततचा ताण, झोपेची कमतरता, धूम्रपान, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले अन्न यामुळे रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो. मात्र असे काही पदार्थ आहेत जे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतात.
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करते. नियमित प्रमाणात वापरल्यास हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते.
या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातात. ओमेगा-३ मुळे शरीरातील सूज कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोन वेळा फॅटी फिश खाल्ल्यास हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
बेरीजमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे घटक रक्तवाहिन्यांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारतं आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
पालेभाज्यांमध्ये फायबर, लोह, फोलेट आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. या भाज्या रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीरातील खराब चरबी कमी करण्यास मदत करतात. रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्यास हृदय अधिक मजबूत राहू शकते.
संपूर्ण धान्यांमध्ये फायबर आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे पदार्थ पचन सुधारतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत मिळतं.
ड्रायफ्रूट्समध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे पदार्थ रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयाचं कार्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. दररोज मर्यादित प्रमाणात बदाम, अक्रोड किंवा पिस्ते खाल्ल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत मिळू शकतं.