Weight Loss Mistakes, 5 Mistake For Weight Loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight Loss Mistakes : तासनतास जीममध्ये व्यायाम करताय? वजन कमी होतच नाहीये? असू शकतात ही गंभीर कारणे

कोमल दामुद्रे

Weight Loss Tips :

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु, काही केल्या आपले वजन कमी होत नाही. नवीन वर्ष सुरु झाल्यावर आपल्यापैकी अनेकांनी वजन कमी करण्यासाठी जीम जॉईन केलीच असेल.

सततचा व्यायाम करुन घाम गाळतात. वजन कमी करतात त्यामुळे अनेक आजारांपासून (Disease) दूर राहाता येते. यामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी वजन कमी करण्यासाठी तासनतास जीममध्ये व्यायाम केला परंतु, त्यांचे वजन कमीच झाले नाही. याबाबत डॉक्टरने सांगितले की, यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी (Weight Loss Tips) होत नाहीये. जाणून घेऊया त्याबद्दल

1. प्रथिने

वजन कमी करण्याच्या नादात अपुरी प्रथिन्यांचे सेवन स्नायूंच्या देखभालीवर आणि भूकेवर परिणाम करतात. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या अडथळ्यांवर परिणाम करतात.

2. जीवनसत्त्व ड

हायपोथायरॉईडीझम, जीवनसत्त्व (Vitamins) ड किंवा बी -१२ च्या कमरतेमुळे वजन कमी करण्याच्या या प्रक्रियेवर समस्या निर्माण होतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. त्यासाठी नियमित आरोग्याची चाचणी करा.

3. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ

बरेचदा वजन कमी करताना प्रोसेस्ड फूड आपण खातो. यामध्ये ज्यूस आणि काही रेडिमेड पदार्थांचा समावेश असतो. उच्च कॅलरी, कमी- पोषक प्रक्रिया केलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी अडथळा आणू शकतात. यामुळे पोटही भरत नाही.

4. निद्रानाशाची समस्या

पुरेशा प्रमाणात झोप घेतली नाही की, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. भुकेशी संबंधित हार्मोन्समध्ये व्यत्यय आणते. ज्यामुळे आपल्याला अधिक भूक लागते. यासाठी किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.

5. चयापचय

जर तुमची चयापचय मंदावत असेल तर तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे कॅलरी बर्न होत नाही. ज्यामुळे वजन कमी होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT