Exercise During Period Saam Tv
लाईफस्टाईल

Exercise During Period: पिरियड्स दरम्यान व्यायाम करणे योग्य की घातक? तज्ञ काय सांगतात?

पिरियड्स दरम्यान व्यायामाचा विचार केला तर बहुतेक मुलींना असे वाटते की पीरियड्स दरम्यान व्यायाम करू नये. पण याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे हे देखील जाणून घ्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पीरियड्स (Periods) ही एक सामान्य नैसर्गिक जैविक (Natural) प्रक्रिया आहे. साधारणपणे, मुलींना वयाच्या 12व्या वर्षापासून मासिक पाळी (Menstrual Cycle) येण्यास सुरुवात होते, जी मेनोपॉजच्या 45-55 वर्षांपर्यंत सुरु असते. या दरम्यान, मुली किंवा महिलांमध्ये अनेक हार्मोनल आणि शारीरिक (Hormonal and physical changes) बदल होतात, ज्यामुळे त्यांचा मूड बदलणे, राग, चिडचिड आणि भावनिक होणे असे काही बदल होत असतात आणि हे सामान्य आहे.

Period Cramps

मासिक पाळी दरम्यान व्यायाम करावा की नाही?

तज्ञांच्या मते, पीरियड्समध्ये व्यायाम करू नये' ही केवळ एक मिथ आहे, जे आपण बऱ्याच काळापासून ऐकत आलो आहोत. परंतु, मासिक पाळी दरम्यान व्यायाम करणे फायदेशीर आहे, परंतु ते स्त्रियांच्या शरीराच्या प्रकारावर (Body Type) देखील अवलंबून असते. जर एखाद्याला जास्त वेदना (Period Cramps) होत असतील तर त्यांनी मासिक पाळीतील पहिले 1-2 दिवस व्यायाम करू नये, त्यानंतर त्यांना बरे वाटले तर त्या, आराम मिळेल तेव्हा ते व्यायाम करू शकतात.

Mood Swings

डॉ. क्रिस्टोफर हॉलिग्सवर्थ (Dr. Christopher Holligsworth) यांच्या मते, मासिक पाळीचा काळ हा हार्मोनल बदलांच्या दृष्टीने अत्यंत कठीण काळ असतो. या दरम्यान, शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची या हार्मोन्सची पातळी कमी होते, ज्यामुळे महिलांना शरीरात अधिक थकवा येतो. पण जर कोणाला अधिक थकवा आणि अशक्तपणा जाणवत नसेल तर ती हलका व्यायाम करू शकते.

पीरियड्सच्या काळात अनेकदा महिलांचा मूड चिडचिड होत राहतो, त्या काळात जर एखाद्याने व्यायाम केला तर त्याचा मूडही बरोबर होण्यास मदत होते. आणि त्या दिवसात राहणाऱ्या काही सामान्य समस्याही दूर होऊ शकतात. या काही दिवसात व्यायामाचे खालील फायदे तज्ञ सांगतात.

Exercise During Period

1. PMS लक्षणे कमी करा;

मासिक पाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत काही लक्षणे समजतात, ज्यात थकवा, चिडचिड, राग इ. येतात, याला प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम (PMS) म्हणतात. ही लक्षणे व्यायामाने कमी करता येतात. ही लक्षणे कमी करण्यासाठी हलका एरोबिक व्यायाम करणे उपयोगी ठरते.

2. वेदना कमी करा आणि मूडला सुधारा

व्यायामामुळे शरीरातील नैसर्गिक एंडोर्फिन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो आणि त्या काळात पीएमएसची लक्षणे कमी होऊ शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एंडोर्फिन हे नैसर्गिक वेदना कमी करणारे हार्मोन आहे, जे व्यायामादरम्यान शरीरात सोडले जाते. मासिक पाळी दरम्यान व्यायाम केल्याने हा हार्मोन बाहेर पडतो आणि वेदना कमी होते.

Happy Mood

4. मूड चांगला ठेवा;

व्यायाम केल्याने शरीरातील मेंदूला पुरवठा होणारा रक्तपुरवठा सुधारतो, यामुळे मन बरोबर राहते आणि तुम्हाला आनंदी वाटते.

3. शक्ती वाढवा

एका संशोधनानुसार, मासिक पाळीच्या पहिल्या 2 आठवड्यात (म्हणजे जेव्हा मासिक पाळी आली तेव्हा) हार्मोन्सची पातळी कमी होते आणि परिणामी ताकद कमी होते. त्यादिवशीही जर व्यायाम केला तर त्यांना चांगले वाटण्यास मदत होईल.

Cycling

5. नियमित व्यायाम करा;

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होतात. जर एखाद्याने नियमित व्यायाम केला तर ती या वेदनापासून मुक्त होऊ शकते. व्यायाम म्हणजे जसे की चालणे, वेगाने चालणे, थोडासा हलका व्यायाम केल्याने देखील ही लक्षणे कमी होण्यास मदत होते.

Dancing

मासिक पाळी दरम्यान कोणता व्यायाम करणे चांगले?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पीरियड्समध्ये हलका व्यायाम करावा, ज्यामध्ये कमी आणि मध्यम तीव्रतेचे व्यायाम येतात. जसे, तुम्ही योगा, चालणे, सायकलिंग, डान्स असे देखील करू शकता, परंतु त्यांचा वेळ फक्त 30 मिनिटे असू द्या. याशिवाय, असा व्यायाम करू नका ज्यामध्ये तुमचे पाय पोटाच्या वर जातील, म्हणजेच पाय आणि छातीमध्ये 90 डिग्रीचा कोन नसावा. क्रंच, सिट अप यासारखे व्यायाम करणे टाळाच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT