Best Books For Women Saam Tv
लाईफस्टाईल

Best Books For Women : प्रत्येक 'स्त्री' ने आवर्जून वाचावी अशी पुस्तके, जाणून घ्या प्रेरणादायी आत्मकथा

Books For Women : अनेक लोकांना पुस्तक वाचायची आवड असते. काही व्यक्तींकडे पुस्तकांचा मोठा संग्रह सुद्धा असतो. पंरतू महिलांंनी एकदा तरी ही पुस्तक नक्कीच वाचली पाहिजे.

Mruga Vartak

स्त्री बोलू लागली तसे समाजाला कान फुटले. स्त्री, पुरुष, अबालवृद्ध तिला ऐकू लागले. तिच्याच आवाजाने तिला बळ दिलं आणि तीने घराचा उंबरठा लांघला. पुढे ती शिकू लागली आणि स्वप्न पाहू लागली. स्वप्न पाहण्याची किंमत जास्त असते. ती किंमत चुकवण्यासाठी सोशिकता नावाचा गुण जडवून घेतला तिने स्वतःला. तो तिच्या लेखणीत उतरला आणि तिचे शब्द दशदिशांनी घुमत गेले. स्त्री लिहू लागली आणि काळानेही तिचे शब्द पुढे नेले. स्त्रियांनी लिहून ठेवलेली अनेक आत्मचरित्रेही गाजली.अशा गाजलेल्या 5 पुस्तकांविषयी आज लिहितेय.

स्मृतिचित्रे - रेवरंड टिळक यांच्या पत्नीचं लक्ष्मीबाई टिळकांचं हे आत्मचरित्र आणि आणि त्यात बरचसं टिळकांचं चरित्रही आलंय. अस्सल कोकणस्थी घरात जन्म झालेल्या लक्ष्मीबाई लग्नानंतर देशस्थांच्या घरात गेल्या. तिथल्या सर्वच परंपरा, पद्धती नवीन. शिकवण्यासाठी सासूही नाही. अशावेळी सगळं एकटीने समजून घेताना तारांबळ व्हायची. पती कवी. त्यात त्यांनी धर्म बदललेला. हातात पैसा नाही, शिक्षण नाही. नातेवाईकांच्या आधारे राहतानाच्या आठवणी त्यांनी दिल्या आहेत.

2 आहे मनोहर तरी - आपण किती सहज म्हणतो, पुल आणि सुनिता बाई म्हणजे आदर्श जोडा. परंतु खरंच असं होतं का... पुलंच्या स्वभावातले गुण-दोष त्यांनी अगदी मोकळ्या मनाने लिहीलेत. आपल्याला माहिती असलेले पुलं आपल्या डोक्यात पक्के असतात, हे पुस्तक वाचताना त्यांच्या व्यक्तीमत्वाची विविध आयामांतून कल्पना येते.

नाच गं घुमा - हे पुस्तक माधवी देसाई यांचे आत्मकथन आहे. भालजींच्या कन्या (Virgo)आणि सुप्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. एवढे असूनही त्यांच्या वाटेला आलेला भोगवटा कुणा निराधार स्त्रीलाही येउ नये ईतका कठीण असा. गोव्यासारख्या समृद्ध भुमीत सासर तर कोवाडच्या ईनामदार वाड्याच्या त्या सून. भालजींसारख्या सिनेसम्राटाच्या त्या कन्या असून आयुष्याचा अर्धाअधिक कालावधी त्यांनी हलाखीत व्यतीत केलाय...

अँन फ्रेंकची रोजनीशी - ज्यूंवर हल्ले होत असत त्याकाळात अनेक कुटुंबे भुमिगत झाली. आशाच एका कुटुंबात अँन चा जन्म झाला. एका ईमारतीच्या तळघरात तिच्या आयुष्याचा मोठा काळ गेला. आपण सूर्यप्रकाश पाहू शकतो यावर तिचा विश्वासही नव्हता. त्यावेळी तिच्या आयुष्यातल्या त्या वर्षांवर तिने रोजनीशी लिहिली. तिच्या मृत्युंनंतर 2 महिन्यांनी त्यांची सुटका झाली आणि तिची रोजनीशी त्यानंतर प्रकाशात आली

अन्या ते अनन्या - एका विवाहित दंतरोगतज्ज्ञ असणाऱ्या इसमावर भाळून त्याच्यासोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय लेखिकेने प्रभा खेतान यांनी घेतला. समाजाची, कुटुंबाची पर्वा न करता ती राहिली. सर्व प्रकारची मदत तिने आपल्या प्रियंकारासोबतच त्याच्या कुटुंबालाही केली. लग्नाशिवाय आपल्यापेक्षा वयाने बरेच प्रौढ (adult)असणाऱ्यासोबत राहणे सोपे नव्हतेच. याकाळात, या संपूर्ण प्रवासात तिच्यावर अनेक मानसिक आघात झाले. हे सर्व अनुभव कथन या पुस्तकात विस्ताराने आलंय.

वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या समाजातल्या स्त्रियांचे प्रश्न(Question) किती वेगवेगळे पण सर्वांचे अनुभव मात्र काही अंशी सारखेच असल्याचे या पुस्तकांतून दिसतं. स्त्रीचं भावाविश्व् उलगडण्याचा प्रयत्न करताना तिच्या पतीचा त्यात महत्वाचा वाटा असतो हे लक्षात येतं. अशी अनेक स्त्री आत्मकथने आहेत. ही काही प्रतिनिधिक व प्रसिद्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Payal Gaming Private Video: 25 वर्षीय युट्यूबरचा 1.20 मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल? सोशल मीडियावर उडाली खळबळ

Konkan Tourism : माझं कोकण भारी! थंडीत 'या' ठिकाणी पिकनिक प्लान करा

Red Flag Boys: तुमच्या बॉयफ्रेंडच्याही अशा सवयी असतील तर वेळीचं व्हा सावध, नाहीतर आयुष्यभर रडालं

Maharashtra Live News Update: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये पुण्यातील पर्यटकांच्या थार जीपने एकाला चिरडलं

Thursday Horoscope: मनोबल वाढेल, ४ राशींना नोकरीत यश मिळेल, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT