Ruchika Jadhav
पुस्तक वाचण्याचे व्यक्तीला अनेक फायदे होतात. पुस्तकं प्रत्येक व्यक्तीचे छान मित्र होऊ शकतात.
पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्या डोक्यावरील ताण कमी होतो. तसेच पुस्तकाचे वाचन करणारी व्यक्ती बुद्धीने तीक्ष्ण असते.
पुस्तकांचे वाचन केल्याने व्यक्ती सकारात्मक बनतात. त्यामुळे विविध काळजीपासून तुमची मुक्तता सुद्धा होते.
पुस्तक वाचताना आपण पूर्णता त्याबद्दलच विचार करत असतो, त्यामुळे काही गोष्टींवरून ताण जाणवत असल्यास तो कमी होतो.
पुस्तकांचे वाचन म्हणजे मनाचा व्यायाम. याची सवय झाल्यास तुमची स्मरणशक्ती मजबूत होते.
पुस्तकांचे वाचन केल्याने आपल्याला छान झोपही लागते. फोनमुळे डोळे दुखतात. मात्र पुस्तकांमुळे डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते.