Beetroot Rasam Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Beetroot Rasam Recipe : बीटरूट रसम कधी पाहिले आहे का? चला तर मग पाहूयात खास बीटरूट रसमची रेसिपी

बीटरूट हे एक सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी अनेक फायदे देते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beetroot Rasam Recipe : बीटरूट हे एक सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी अनेक फायदे देते. अनेकांना ते सॅलडच्या स्वरूपात खायचे असते, काहीजण त्याचा रस पितात तर काहीजण त्याची भाजी करतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला जीवनसत्त्वे मिळतात, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासह इतर अनेक पोषक घटक मिळतात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आता जर तुम्हाला बीटरूट सॅलड, ज्यूस आणि भाज्यांमध्ये (Vegetables) वारंवार खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही त्याची मजेदार रसम देखील बनवू शकता. रसम हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे ज्यामध्ये बीटरूटचे मिश्रण वापरले जाऊ शकते. हे खरच खूप चविष्ट आणि आरोग्यदायी (Healthy) आहे. याची रेसिपी जाणून घ्या

साहित्य -

चिरलेला बीटरूट - 1 वाटी, नारळ - दोन चमचे, तेल - 1 ते 2 टीस्पून, मोहरी - 1/2 टीस्पून, जिरे - 1/2 टीस्पून, उडीद डाळ - 1/2 टीस्पून, एक चिमूटभर हिंग, लसूण पाकळ्या - 6 ठेचून, कढीपत्ता - 15 ते 20, अर्धा कांदा - बारीक चिरून, दोन हिरव्या मिरच्या, चिंचेचा रस एक कप, चवीनुसार मीठ, हळद अर्धा टीस्पून, 1/2 टीस्पून मिरची पावडर, पुदीना पाने, कोथिंबीरीची पाने, बीट रसम रेसिपी

बनवण्याची पद्धत -

  • बीटरूट सोलून घट्ट कापून घ्या, थोडे पाणी घालून 10 मिनिटे शिजवा आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवा.

  • आता 2 चमचे खोबरे मिक्स करून प्युरी बनवा.

  • आता एक मोठा कढई घेऊन त्यात एक छोटा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ आणि हिंग टाका.

  • चिरलेल्या लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता घाला, लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

  • बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली मिरची घालून थोडा वेळ परतून घ्या.

  • आता त्यात एक वाटी चिंचेचा रस, मीठ आणि हळद घालून मिक्स करा.

  • 5 मिनिटे उकळवा आणि त्यात तयार बीटरूट प्युरी घाला.

  • रस्सम चांगली शिजण्यासाठी थोडे पाणी घालून 5 मिनिटे उकळू द्या.

  • आता मिरची पावडर आणि पुदिन्याची पाने घालून उकळवा.

  • आता शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला आणि मीठ तपासा, गरम बीटरूट रसम तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नमाज पठाणावरुन शनिवारवाड्यात आंदोलन

Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

SCROLL FOR NEXT