Evening Tea Benefits
Evening Tea Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Evening Tea Benefits : संध्याकाळच्या वेळी 3 ते 5 दरम्यान चहा पिताय ? फक्त त्यात 'हे' मिसळा, रात्री लागेल शांत झोप

कोमल दामुद्रे

Evening Tea Benefits : चहा म्हटलं की, असंख्य चहाप्रेमींच्या जीभेवर त्याचा गोडवा येतो. त्याचा एक सिप घेतला नाही तर दिवसाची सुरुवात प्रसन्न होत आहे. काहींना तर चहा दिवसातून ३ ते ४ वेळेस हमखास लागतोच.

दुपारच्या जेवणानंतर देखील लगेच चहा पिणारे शौकीन कमी नाही. काही लोकांना संध्याकाळी म्हणजे 4 ते 5 वाजेपर्यंत चहा मिळाला नाही की चिडचिड होते. कुणाला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला तर कुणाला खूप आळशी वाटू लागते. चहाची चव खूप कडक असते, ती न मिळाल्यास अस्वस्थता वाढते.

बघायला गेले तर, यामुळे शरीरात कॅफीनची लालसा निर्माण होते. चहा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी प्यायल्यास त्याचे परिणाम टाळता येतात. जर तुम्ही देखील संध्याकाळच्या चहाचे शौकीन असाल तर तुम्हाला या काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. त्यांचा अवलंब करून चहा प्यायल्यास जास्त फायदा होईल.

संध्याकाळच्या चहाचे फायदे

संध्याकाळच्या चहाची वेळ साधारणतः 3:30 ते 5 पर्यंत मानली जाते. बहुतेक लोकांना या काळात टी-ब्रेक घेणे आवडते. कडक चहा म्हणा किंवा कडक मसाला चायची चव त्यांचा मूड हलका करते. मात्र, जर तुम्हाला झोप किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही यावेळी खास चहा घ्या. त्यात जिरे चहा बडीशेप चहा किंवा रोझशिप फ्लॉवर चहा.

tea benefits

याचे कारण म्हणजे चांगली, गाढ आणि अबाधित झोप मिळविण्यासाठी, तुम्ही झोपण्याच्या किमान 10 तास आधी कॅफिनचे सेवन केले पाहिजे. आता संध्याकाळी ४ वाजता चहा प्यायल्यानंतर तुम्हाला झोप येण्यास त्रास होऊ शकतो किंवा तुम्हाला जास्त स्वप्ने पडू शकतात किंवा तुमची झोप पुन्हा पुन्हा तुटत राहते.

चहामध्ये कोणता ट्विस्ट आणायचा?

  • तुम्ही झोपण्याच्या 10 तास आधी कॅफिनचे सेवन करा. म्हणजेच न्याहारीनंतर एक ते दोन तासांनी तुम्ही तुमचा कॅफीन चहा चाखायला हवा.

  • दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी चहा प्यायचा असेल तर हर्बल चहा प्या. यावेळी हर्बल-चहा पिणे चवीसोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरेल.

  • तुम्हाला दुधाच्या चहासोबत मीठ घालून बनवलेला कोणताही पदार्थ खाण्याची गरज नाही, पण तुम्ही जिरे चहा किंवा इतर कोणताही हर्बल चहा प्यायला तर त्यासोबत खारट कुकीज खाऊ शकता.

  • यामुळे तुमची लालसा आणि हलकी भूकही शांत होईल, तसेच रात्रीच्या जेवणाच्या वेळी तुम्हाला भूकही लागेल आणि रात्री चांगली झोपही लागेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Today's Marathi News Live : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

Bhiwandi Constituency: भिवंडी मतदारसंघात राजकारण तापलं, काॅंग्रेस नेते दयानंद चोरगे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

SCROLL FOR NEXT