Mushroom Corn Masala Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Mushroom Corn Masala : संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा मशरुम कॉर्न मसाला, चटपटीत पदार्थाने येईल तोंडाला चव!

Mushroom Corn Masala Recipe : आपण कॉर्न घालून त्याची चव अधिक प्रमाणात वाढवता येईल. मुलांना चटपटीत खायचे असेल तर मशरुम कॉर्न मसाला रेसिपी ट्राय करु शकता पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

How To Make Mushroom Corn Masala :

उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मुले सतत बाहेर खेळत असतात. या काळात मुलांची एनर्जी अधिक जास्त असते. सतत पाणी प्यायल्याने मुलांचे दीर्घकाळ पोट भरलेले राहाते. परंतु, संध्याकाळच्या वेळी त्यांना भूक लागते.

जर तुम्ही देखील संध्याकाळच्या वेळी नाश्ता बनवण्याचा विचार करत असाल तर ही झटपट रेसिपी पाहा. मशरुम आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर (Benefits) आहे. हे खाल्ल्याने आरोग्याला अधिक फायदा होतो. यामध्ये आपण अनेक पदार्थ घालू शकतो. यामध्ये आपण कॉर्न घालून त्याची चव अधिक प्रमाणात वाढवता येईल. मुलांना चटपटीत खायचे असेल तर मशरुम कॉर्न मसाला रेसिपी (Recipes) ट्राय करु शकता.

1. साहित्य

  • मशरुम - २ कप

  • काजू - २५

  • मीठ - चवीनुसार

  • कांदे - ६

  • टोमॅटो - ८

  • लसूण पेस्ट - २ चमचे

  • धणे पावडर - ४ चमचे

  • फ्रेश क्रीम - ६ चमचे

  • तेल - ४ चमचे

  • स्वीट कॉर्न - १ कप

  • चिरलेली कोथिंबीर - २ चमचे

  • आले पेस्ट - २ चमचे

  • लाल तिखट - ४ चमचे

2. कृती

  • सर्वात आधी मशरुम धुवून स्वच्छ करा. एका मशरुमचे दोन तुकडे करा

  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन घेऊन ५ मिनिटे परतून घ्या.

  • नंतर त्यात आले-लसूण पेस्ट, मीठ, लाल तिखट आणि धणे पूड घालून चांगले मिक्स करा.

  • यामध्ये आता स्वीट कॉर्न आणि मशरुम घाला. काजूची पेस्ट घालून मिक्स करा.

  • ८ ते १० मिनिटे किंवा मशरुम शिजेपर्यंत मंद आचेवर राहू द्या.

  • वरुन फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Pimples On Face: चेहऱ्यावर पिंपल्स येताहेत? ही चूक ठरतेय कारणीभूत, आजच सोडा 'या' वाईट सवयी

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

SCROLL FOR NEXT