Type 2 Diabetes saam tv
लाईफस्टाईल

Type 2 Diabetes: घरच्या जेवणानेही होऊ शकतो टाईप-2 डायबेटीस; काय आहे कारण? तज्ज्ञांनी सांगितलं कोणाला अधिक धोका

Blood Sugar Levels: घरचे जेवण खाऊनही टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढू शकतो का? पोळी, भात, बटाटा, कार्ब्स आणि इन्सुलिन रेजिस्टन्सचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो, जाणून घ्या. संतुलित आहार, व्यायाम, झोप आणि नियमित तपासणीचे महत्त्व समजून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकजण बाहेरचे जेवण टाळतात. याचं कारण म्हणजे घरचे जेवण आरोग्यासाठी चांगलं असतं, असा अनेकांचा समज असतो. घरचं अन्न खाणं ही नक्कीच चांगली सवय आहे. पण फक्त घरचं जेवण केल्याने टाइप-2 डायबिटीजचा धोका पूर्णपणे टळतो असं नाही. आपण रोजच्या जेवणात काय खातो, किती प्रमाणात खातो आणि आपली जीवनशैली कशी आहे, यावरही रक्तातील साखरेची पातळी अवलंबून असते.

तज्ज्ञांच्या मते, जेवणात पोळी, भात आणि बटाट्याचं प्रमाण जास्त असेल तर त्याचाही रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय आहारात भाज्या आणि प्रोटीनचं प्रमाण कमी असल्यास डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

घरच्या जेवणामुळेही ब्लड शुगर कशी वाढते?

आपल्या रोजच्या जेवणात पोळी, भात, बटाटा यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांमध्ये कार्ब्स असतात. शरीरात गेल्यानंतर त्यांचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

एकाच वेळी कार्ब्स असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले आणि त्यासोबत फायबर आणि प्रोटीन कमी घेतलं तर रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. याचा अर्थ पोळी किंवा भात खाणं बंद करावं असं नाही. पण ते किती प्रमाणात खातो, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

जेवणात हिरव्या पालेभाज्या, डाळी, दही आणि प्रोटीन असलेल्या इतर पदार्थांचा समावेश करावा. त्यामुळे आहार संतुलित राहण्यास मदत होते. म्हणजेच घरचं जेवण आरोग्यासाठी फायदेशीर ठरायचे असेल तर त्यात सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात असणं महत्त्वाचे आहे.

या कारणांमुळेही होतो डायबिटीज

टाइप-2 डायबिटीज होण्यामागे इन्सुलिन रेजिस्टन्स हे एक महत्त्वाचं कारण आहे. इन्सुलिन हा शरीरातील एक हार्मोन आहे. तो रक्तातील साखर शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नसेल तर रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी रक्तातच राहते. हळूहळू रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि टाइप-2 डायबिटीज होण्याचा धोका निर्माण होतो.

याशिवाय कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असणं, वाढतं वय, पोटाभोवती जास्त चरबी जमा होणं आणि दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणं यामुळेही डायबिटीजचा धोका वाढतो. पुरेशी झोप न मिळणं आणि शरीराची हालचाल कमी असणं याचाही रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे फक्त बाहेरचं खाणं बंद करून डायबिटीज होणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर असं नाहीये

डायबिटीजपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

डायबिटीजची सुरुवात झाली तरी अनेकदा शरीरात कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर वाढली आहे, हे अनेकांना समजतही नाही. अशा वेळी वेळेवर तपासणी करणं महत्त्वाचं ठरतं.

रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी फास्टिंग ब्लड शुगर आणि HbA1c या चाचण्या केल्या जातात. HbA1c चाचणीमुळे मागील साधारण तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी समजते. ज्या लोकांच्या कुटुंबात डायबिटीजचा इतिहास आहे किंवा ज्यांना डायबिटीज होण्याचा धोका जास्त आहे, त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळोवेळी या तपासण्या करून घ्याव्यात.

डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रोजच्या जेवणात भाज्या आणि डाळींचं प्रमाण वाढवावं. पोळी आणि भात योग्य प्रमाणात खावा. यासोबतच रोज काही वेळ चालणं किंवा इतर शारीरिक हालचालींसाठी वेळ काढावा. पुरेशी झोप घेणं आणि वजन नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा परिषदेत होणाऱ्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे देखील राहणार हजर

5 Detox Drink For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी प्या 5 डिटॉक्स ड्रिंक्स, घरी बनवण्याची रेसिपी सोपी

Namo Shetkari Yojana : तुमचेही ६ हजार रुपये अडकलेत का? ९१ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, आत्ताच चेक करा

Maharashtra Politics: शिंदेसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बडा नेता आज 'धनुष्यबाण' घेणार हाती

पंढरपूरमध्ये भयंकर दुर्घटना; विहिरीचा कठडा कोसळून ४ जण ढिगाऱ्याखाली, तिघांचे मृतदेह बाहेर काढले

SCROLL FOR NEXT